1 / 8मलेशिया व इंडोनेशियामधल्या लाखो लोकांना सूर्यग्रहण बघायला मिळाले.2 / 8काही ठिकाणी अर्धग्रहहण बघायला मिळाले तर काही ठिकाणी संपूर्ण सूर्यग्रहण दिसलं.3 / 8प्रार्थनास्थळांमध्येही एकत्र येत लोकांनी या दिवशी प्रार्थना केल्या.4 / 8सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी किंवा दुर्बिणीतून बघू नका असा सल्ला तज्ज्ञांनी दिला होता.5 / 8लोकं मोकळ्या जागी जमा झाली आणि जसं जमेल तसं त्यांनी सूर्यग्रहण बघितलं.6 / 8संपूर्ण सूर्यग्रहणाच्यावेळी जवळपास तीन मिनिटांसाठी अंधार पसरला.7 / 8चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या बरोबर मध्ये आल्यावर सूर्य संपूर्ण झाकला जातो आणि भरदिवसा काळोख पसरतो. हा प्रकार संपूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी इंडोनेशिया मलेशिया कंबोडिया सिंगापूर आदी काही देशांनी अनुभवला.8 / 8बुधवारी (9 मार्च 2016) सकाळी इंडोनोशियामध्ये सूर्यग्रहण दिसलं. चंद्रानं सूर्याला संपूर्ण झाकल्यामुळे मालुकू बेटावर संपूर्ण ग्रहण दिसलं आणि सुमारे तीन मिनिटांसाठी भरदिवसा काळोखाचं साम्राज्य पसरलं.