Electric Plane: कॅब, टॅक्सीपेक्षाही कमी भाडे, जगातील पहिल्या इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:37 IST
1 / 7चारचाकी इलेक्ट्रिक कारच्या जमान्यात इलेक्ट्रिक विमान उडणार आहे, ज्याचे तिकिटही अतिशय कमी असणार आहे.2 / 7अमेरिकामधील बेटा टेक्नोलॉजीज एलिया सीएक्स ३०० कंपनीने इलेक्ट्रिक विमानाच्या उड्डाणाचा प्रयोग यशस्वी केला आहे.3 / 7ही यशस्वी चाचणी हवाई वाहतूक क्षेत्रात पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.4 / 7इलेक्ट्रिक विमानाचा यशस्वी प्रयोग करणारी अमेरिका पहिला देश ठरला आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान जगभरात पोहचल्यास हवाई प्रवास खूपच स्वस्त होणार आहे.5 / 7इलेक्ट्रिक विमानाने १३० किमीच्या प्रवासासाठी फक्त ३० मिनिटांचा कालावधी लागतोय. शिवाय, प्रवाशाला ६९४ रुपयांत १३० किलोमीटरपर्यंत प्रवास करता येणार आहे.6 / 7बेटा टेक्नोलॉजीजच्या या नव्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात हवाई प्रवास सामान्यांसाठी अधिक स्वस्त होण्याची शक्यता आहे.7 / 7यावर्षीच्या अखेरीस अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन प्रशासनाकडून (FAA) या विमानाला मंजुरी मिळेल, असे बेटा टेक्नोलॉजीज कंपनीने सांगितले.