शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोठे संकट येण्याची शक्यता, पुन्हा दिसला तो रहस्यमयी मासा; गेल्यावेळी ७.० तीव्रतेचा भूकंप आलेला, त्यापूर्वी त्सुनामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 19:44 IST

1 / 7
मोठ्या संकटाचे संकेत देणारा मासा पुन्हा एकदा समुद्राच्या पाण्याबाहेर आला आहे. काही आठवड्यांपूर्वी असाच हा मासा समुद्राच्या पाण्याबाहेर दिसला होता. यानंतर लगेचच ७.० तीव्रतेचा भूकंप आला होता.
2 / 7
आता हा मासा मेक्सिकोच्या समुद्र किनाऱ्यावर दिसला आहे. त्याला तेथील लोकांनी पुन्हा समुद्रात सोडले आहे. परंतू मान्यतेनुसार हा मासा दिसला की काहीतरी मोठे संकट ओढवते, असे म्हटले जाते. यामुळे येथील लोक चिंतेत आले आहेत.
3 / 7
मेक्सिकोच्या समुद्र किनाऱ्यावर डुम्सडे नावाने ओळखल्या जाणारा मासा दिसला आहे. याला माशाला ओअरफिश असेही म्हटले जाते.
4 / 7
हा मासा कॅलिफोर्नियाच्या बेटावर दिसला आहे. या माशाची लांबी सर्फबोर्ड एवढी आहे. या माशाच्या शेपटीला जखम झालेली होती. गेल्या वर्षी, कॅलिफोर्नियामध्ये एक ओअरफिश दिसला होता, त्यानंतर काही आठवड्यांनी ७.० तीव्रतेचा भूकंप आला होता.
5 / 7
जपानी पौराणिक कथांमध्ये त्यांचे वर्णन 'समुद्राच्या ड्रॅगन देवाच्या राजवाड्यातील दूत' असे केले जाते. जेव्हा मोठा भूकंप किंवा नैसर्गिक आपत्ती येणार असते तेव्हा हा मासा पृष्ठभागावर येतो असे मानले जाते.हा मासा खूप शक्तिशाली त्सुनामीच्या आगमनाचे संकेत देतो.
6 / 7
असे असले तरी संशोधकांनी याची पुष्टी केलेली नाही. परंतू, २०११ मध्ये जपानमध्ये आलेल्या विनाशकारी त्सुनामी आणि ९.० रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या काही महिन्यांपूर्वी समुद्रकिनाऱ्यावर २० ओअरफिश मृतावस्थेत आढळले होते.
7 / 7
ओअरफिश समुद्राच्या खोलवर राहतात आणि जेव्हा मोठा नैसर्गिक धोका असतो तेव्हाच ते पृष्ठभागावर येतात. हे मासे जपानच्या बेटांच्या खाली राहतात आणि लोकांना भूकंपांबद्दल सावध करण्यासाठी पृष्ठभागावर येतात.
टॅग्स :Earthquakeभूकंप