बंद होऊ शकते Tesla कंपनी! चीनच्या या पावलामुळे Elon Musk यांनी व्यक्त केली शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 21:20 IST
1 / 10चीनच्या लष्करानं आपल्या काही केंद्रांवर Tesla च्या कार्सच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. तर दुसरीकडे यानंतर टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी Elon Musk यांनी आपली कंपनी बंद होण्याची शक्यता व्यक्त केली. 2 / 10जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेल्या मस्क यांचा समावेश आहे. जर टेस्लाच्या कार्स हेरगिरीसाठी वापरल्या गेल्या तर त्यांची कंपनी बंद होऊ शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. 3 / 10केवळ चीनच नाही तर जगातिल कोणत्याही देशात असे प्रकार घडल्यास टेस्ला कंपनी बंद होऊ शकते. टेस्लाच्या विक्रीचा ३० टक्के हिस्सा हा केवळ चीनमध्येच आहे.4 / 10नुकतंच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिनी लष्करानं टेस्लाच्या कार्स आपल्या कॉम्प्लेक्समध्ये घुसण्यास मनाई केली होती.5 / 10चिनी लष्करानुसार टेस्लाच्या कार्समध्ये लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमुळे सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो असं सांगण्यात आलं होतं. 6 / 10जगातील सर्वात मोठी कारची बाजारपेठ चीन ही आहे. तसंच इलेक्ट्रीक वाहनांसाठीही जगातील कंपन्यांसाठी ती एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. 7 / 10टेस्लानं गेल्या वर्षी चीनमध्ये १ लाख ४७ हजार ४४५ कार्सची विक्री केली होती. जगात टेस्लाच्या कार्सच्या विक्रीच्या ती ३० टक्के इतकी होती. 8 / 10तसंच या वर्षी टेस्लाला चीनची एक कंपनी नियो इंककडूनही टक्कर मिळत आहे. टेस्ला चीनमध्ये न केवळ आपल्या कार्सची विक्री करते, याशिवाय त्या ठिकाणी कारचं उत्पादनही करते. 9 / 10२०१९ मध्ये त्यांनी अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्याशी मंदळ ग्रह आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर चर्चा केली होती. 10 / 10गेल्या वर्षी चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या टेस्लाच्या मॉडेल-३ सेडान्सच्या डिलिव्हरी इव्हेंटमध्ये मस्क यांनी स्टेजवर डान्सही केला होता. यानंतर अनेकांनी त्यांचं कौतुकही केलं होतं.