म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
विमानातून बॉम्बफेक करून ट्रम्प यांना ठार मारण्याचा इराणचा कट?; 'त्या' ट्विटनं एकच खळबळ
By कुणाल गवाणकर | Updated: January 22, 2021 20:49 IST
1 / 10अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात इराण मोठा कट रचत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इराणकडून करण्यात आलेल्या एका ट्विटमुळे याबद्दलच्या चर्चेला उधाण आलं आहे.2 / 10इराणनं पुन्हा एकदा बदल्याची भाषा केली आहे. इराणमधील तस्नीम नावाच्या वृत्तसंस्थेनं एक फोटो ट्विट केला आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प गोल्फ खेळताना दाखवण्यात आले आहेत.3 / 10डोनाल्ड ट्रम्प खेळत असलेल्या गोल्फ मैदानावर बी-२ या अणूबॉम्ब फेकू शकणाऱ्या विमानाची सावली दिसत आहे. 4 / 10इराणी लष्कराचे जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा आदेश देणाऱ्यांचा बदला घेऊ, असा सूचक इशारा ट्विट करण्यात आलेल्या फोटोसह देण्यात आला आहे.5 / 10बी-२ बॉम्बरच्या छायेत डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो प्रसिद्ध करणाऱ्या तस्नीम वृत्तसंस्थेनं 'बदला घेणं अनिवार्य आहे' असं शीर्षकात म्हटलं आहे.6 / 10इराणी लष्कराचे टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी इराणमधील सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खोमेनेई यांनी डिसेंबरमध्ये दिली होती.7 / 10अमेरिकेचे अध्यक्ष असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येचे आदेश दिले होते.8 / 10३ जानेवारी २०२० रोजी एका ड्रोन हल्ल्यात अमेरिकी सैन्यानं सुलेमानी यांची हत्या केली. सुलेमानी बगदादमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कारनं निघाले असताना त्यांची हत्या करण्यात आली.9 / 10अमेरिकेनं सुलेमानी यांची हत्या केल्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले. इराणनं इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले.10 / 10ट्रम्प यांच्या अटकेसाठी इराणनं काही दिवसांपूर्वी इंटरपोलची मदत मागितली. ट्रम्प यांच्यासह अमेरिकेच्या ४७ अधिकाऱ्यांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करा, अशी मागणी इराणनं केली आहे.