ऐकावं ते नवलंच! चक्क पित्यानं मुलीला 96 कोटींचा हिरा दिला गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 23:14 IST
1 / 5मुलीच्या आनंदाखातर वडील काय करतील काहीही सांगता येत नाही. हाँगकाँगमध्येही एका पित्यानं मुलीला तब्बल 96 कोटी रुपयांचा हिरा गिफ्ट दिला आहे.2 / 5एका बहुमूल्य हिऱ्यासाठी वडिलांनी 96 कोटी रुपयांची बोली लावली आहे. 3 / 5'ज्वेल्स अँड जेडाइट' या लिलावात अनेक बहुमूल्य आणि सुंदर हिरे ठेवण्यात आले होते. त्याचच ओव्हल शेप हिऱ्याचाही समावेश होता. 4 / 5 या हिऱ्यानं जपानमधून आलेल्या दाम्पत्याला आकर्षित केले. या दाम्पत्यानं 88.22 कॅरेटचा हा हिरा खरेदी केला असून, त्या हिऱ्याला मुलीचं नाव दिलं आहे. 5 / 5या हिऱ्याला आता 'मनमी स्टार' नावानं ओळखलं जातंय. या लिलावात 200 पेक्षाही अधिक मौल्यवान वस्तू लिलावासाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यात तीन हिरे हे ओव्हल शेप होते, त्यातील 'मनमी स्टार' या हिऱ्यानं लोकांना आकर्षित केले.