शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेच्या न्यूक्लियर बेसवर सापडला धोकादायक पदार्थ, अनेकांना कर्करोगाची लागण, एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:13 IST

1 / 7
अमेरिकेच्या हवाई दलाने मोंटाना येथे न्यूक्लिअर बेसवर कॅन्सर पसरवणारे धोकादायक पदार्थ सापडल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. तपासामध्ये येथे कार्सिनोजेनची स्पष्ट लक्षणे सापडली आहे. तसेच नमुन्यांमध्ये २६८ कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक कॅन्सर आणि इतर जीवघेणे आजार जडले असल्याचे दिसून आले आहेत. दरम्यान, लोकांवर उपचारांचे आणि अंडरग्राऊंड कंट्रोल केंद्राच्या स्वच्छतेचे आदेश देण्यात आले आहेत.
2 / 7
न्यूक्लियर मिसाईल नियंत्रण तळावर काम करणाऱ्या लोकांनी केलेल्या मागणीनुसार ही तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये येथून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये पीसीबी (कर्करोग पसरवणारे घटक)चं प्रमाण पर्यावरण संरक्षण एजन्सीच्या निकषांपेक्षा अधिक असल्याचं समोर आलं आहे.
3 / 7
एका रिपोर्टनुसार येथे अनेक वर्षांपासून काम करत असलेले कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक हे कर्करोग आणि रक्ताशी संबंधित अनेक आजारांशी झुंजत होते. त्यांच्या मागणीनुसार या तळावरून नमुने गोळा करण्यात आले. त्यामध्ये कार्सिनोजन नावाचा घटक सापडला. तसेच पीसीबी एक असा पदार्थ आहे, जो रक्ताच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरतो.
4 / 7
हवाई दलाच्या ग्लोबल स्ट्राइक कमांडचे कमांडर जनरल थॉमस बसर यांनी सांगितले की, दोन्ही केंद्रांच्या स्वच्छता प्रक्रियेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आमचे वायुसैनिक आणि त्यांच्या नातेवाईकांना संभाव्य आजारापासून वाचवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
5 / 7
यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये ९ कार्यरत आणि माजी एअरमनवर दुर्मीळ रक्ताच्या कर्करोरावर उपचार करण्यात आले. त्यानंतर येथे काम करणाऱ्या लोकांचे नमुने घेऊन तपास सुरू करण्यात आला. या रिपोर्टनुसार २६८ लोकांनी स्वत: कॅन्सर किंवा अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती दिली. यामधील २१७ कर्करोगग्रस्त आहेत. तर इतर ३३ जणांना ब्लड कॅन्सर झाला आहे.
6 / 7
येथे फॅसिलिटिमध्ये काम करणारे मिसायलर खूप कमी आहेत. येथे दरवर्षी सुमारे ३ मिनुटमेन-III आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईल लॉन्च होतात. त्यासाठी सुमारे ६०० कर्मचारी काम करतात. १९६० पासून आतापर्यंत येथे २१ हजार कर्मचाऱ्यांनी काम केलं आहे.
7 / 7
मिनुटमेन-III अमेरिकेची सर्वात विध्वंसक आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईल आहे. तिचा वेग २४ हजार किमी प्रति तास एवढा आहे. तर तिची मारक क्षमता १० हजार किमीपर्यंत आहे. तिचं संपूर्ण नाव एलजीएम ३०जी मिनुटमेन असं आहे.
टॅग्स :United StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय