शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Oxford Vaccine on Coronavirus: कोरोनावरची लस सुरक्षित, पण 'हे' साईड इफेक्ट्सही दिसले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 9:51 PM

1 / 10
जगातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे कोरोनावरील लस शोधण्याचे प्रयत्न संपूर्ण जगात सुरू आहेत. त्यात ऑक्सफर्ड विद्यापीठानं आघाडी घेतल्याचं दिसत आहे.
2 / 10
ऑक्सफर्डनं तयार केलेली लस सुरक्षित असल्याचं मानवी चाचण्यांमधून समोर आलं आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेल्या कोरोना लसीची सध्या मानवी चाचणी सुरू आहे.
3 / 10
शेकडो जणांना ही लस टोचण्यात आली. त्यातून समोर आलेले निष्कर्ष दिलासादायक असल्याची माहिती ब्रिटिश मेडिकल जर्नल लॅन्सेटनं दिली आहे. ऑक्सफर्डनं तयार केलेल्या लसीला शरीरातल्या रोगप्रतिकार यंत्रणेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं लॅन्सेटनं म्हटलं आहे. ही लस रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करत असल्याचंदेखील लॅन्सेटनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे.
4 / 10
१८ ते ५५ वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात आल्यावर त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकार यंत्रणेकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातून मिळालेला प्रतिसाद चांगला आहे, अशी माहिती ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या जेन्नर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. ऍड्रियन हिल यांनी दिली.
5 / 10
विषाणूचा सामना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अँटीबॉडीजची निर्मिती करण्याचं काम ऑक्सफर्डची लस करत आहे. यासोबतच लसीची शरीरातील टी-सेल्ससोबत रिऍक्शन होते. त्यामुळे कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यात मदत होते, असं हिल्स यांनी सांगितलं.
6 / 10
ऑक्सफर्डनं तयार केलेल्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. एकट्या अमेरिकेत या लसीची चाचणी जवळपास ३० हजार लोकांवर करण्यात आली आहे. ही लस जगभरात वापरली जाऊ शकते का, याची माहिती येत्या वर्षाच्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल, असा अंदाज हिल यांनी वर्तवला.
7 / 10
ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेली लस सुरक्षित असल्याचं वृत्त बीबीसीनं दिलं आहे. मात्र या लसीचे काही साईड इफेक्ट्स दिसून आल्याचंही बीबीसीनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
8 / 10
ऑक्सफर्डनं तयार केलेली लस मानवी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवत असल्याचं चाचण्यांमधून दिसून आलं आहे. मात्र ही लस टोचून घेतलेल्या ७० टक्के लोकांना साईड इफेक्ट जाणवले.
9 / 10
लस टोचून घेतलेल्या ७० टक्के जणांना ताप आणि डोकेदुखीचा त्रास जाणवला. मात्र हा त्रास गंभीर नसून तो पॅरासिटामॉलच्या माध्यमातून दूर होऊ शकतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
10 / 10
तयार करण्यात आलेली लस कोरोनावर उपयुक्त असल्याचं जाहीर करण्यासाठी आणखी काही कालावधी गरजेचा असल्याचं ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिका सारा गिल्बर्ट यांनी सांगितलं. मात्र या लसीचे सुरुवातीचे परिणाम उत्साहवर्धक असल्याचं त्यांनी सांगितलं.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या