Coronavirus: Omicron च्या सब-व्हेरिएंट BA.2 नं चिंता वाढवली; यूकेच्या रिसर्चमध्ये नवा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 15:41 IST
1 / 10गेल्या २ वर्षापासून जगभरात कोरोना व्हायरस(Coronavirus) महामारीनं सर्व देशांसमोर संकट उभं केले आहे. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटमुळे वैज्ञानिकांची चिंता वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या लसीकरण हा एकमेक पर्याय आहे.2 / 10त्यातच कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसून आलं. आता कोरोनाच्या ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटचा सब व्हेरिएंट BA 2 हा मूळ BA 1 च्या तुलनेत वेगाने पसरत असल्याचं आढळलं आहे.3 / 10परंतु कोरोना लस BA 2 या ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटविरोधात प्रभावी ठरत असल्याने दिलासा आहे. सध्या सब व्हेरिएंट BA 2 ब्रिटनमध्ये व्हेरिएंटच्या श्रेणीत ठेवलं आहे. BA2 संक्रमण दर इंग्लंडच्या सर्व क्षेत्रात BA 1 च्या तुलनेत वाढत आहे. 4 / 10२४ जानेवारीपर्यंत जीनोम सिक्वेंसिंगमध्ये इंग्लंड BA 2 च्या १ हजार ७२ रुग्णांची नोंद झाली. या संदर्भात प्राथमिक स्तरावर चौकशी सुरु आहे. तुलनात्मकरित्या सध्या या रुग्णांची संख्या कमी आहे. यूकेएचएसएच्या रिपोर्टनुसार, नव्या व्हेरिएंटचा संक्रमण दर कमी होण्याची शक्यता आहे.5 / 10तज्ज्ञांच्या मते, संपर्कात येणाऱ्या लोकांची आकडेवारी पाहिली तर २७ डिसेंबर २०२१ ते ११ जानेवारी २०२२ या काळात ओमायक्रॉन संक्रमण दर १०.३ टक्क्यांच्या तुलनेत BA 2 चा संक्रमण दर १३.४ टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.6 / 10अभ्यासानुसार, BA 1 च्या तुलनेत BA 2 आजाराविरोधात लसीचा प्रभाव कमी असल्याचे काही संकेत मिळाले नाहीत. २ डोस घेतलेल्यांना २५ पेक्षा जास्त आठवडे BA 1वर लसीचा प्रभाव ९ टक्के तर BA 2 विरोधात लसीचा प्रभाव १३ टक्के होता.7 / 10लसीच्या तिसऱ्या डोसनंतर २ आठवड्यात BA 1 विरोधात लसीचा प्रभाव वाढून तो ६३ टक्क्यांपर्यंत पोहचला तर BA 2 या ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटविरोधात कोरोना लसीचा प्रभाव ७० टक्के आहे. असा या स्टडी रिपोर्टमधून आता समोर आलं आहे.8 / 10यूकेएचएसएचे मुख्य मेडिकल सल्लागार डॉक्टर सुसान हॉपकिंस यांनी सांगितले की, आता इंग्लंडच्या सर्व भागात ओमायक्रॉनच्या BA 2 सब व्हेरिएंटचा संक्रमण दर वाढलेला पाहायला मिळत आहे. आम्ही केलेल्या स्टडीत BA 1 च्या तुलनेत BA 2 चा अधिक संक्रमण दर आहे.9 / 10दरम्यान ओमयक्रॉन व्हेरिएंटमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे. परंतु काही भागात वयस्क वयोगटातील प्रकरणात रुग्णालयात दाखल आणि मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आपल्याला सतर्कता बाळगणं गरजेचे आहे. कारण आता निर्बंध हटवले जात आहेत. 10 / 10कोरोनाच्या BA-2 या नवीन प्रकाराची लक्षणे ओमायक्रॉन सारखीच आहेत. ओमायक्रॉनसाठी ज्या जेनेटीक सोर्सला पाहिले जाते, त्यात BA-2 आढळला आहे. त्यामुळे फक्त जेनेटीक सिक्वेंसीक करुनच हा व्हेरिएंट ओळखला जाऊ शकतो