शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

"डॉक्टरांनी माझ्या मृत्यूची बातमी देण्याची तयारी केली होती"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 19:49 IST

1 / 9
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात दिली आहे. एक आठवड्यापूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर त्यांनी पुन्हा कामकाज सुरु केले आहे. त्यांनी एका मुलाखतीत कोरोनाविषयीची माहिती दिली.
2 / 9
यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूची बातमी देण्याची तयारी केली होती, असे बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे.'द सन'ला दिलेल्या मुलाखतीत बोरिस जॉन्सन यांनी सांगितले की, त्यांना कोरोनाच्या उपचारादरम्यान अनेक लीटर ऑक्सिजन देण्यात आला.
3 / 9
55 वर्षीय बोरिस जॉन्सन म्हणाले, 'तो कठिण काळ होता. मी नाकारू शकत नाही. माझ्या तब्येतीत फार सुधारणा होत नव्हती. मला माहीत होती की, आकस्मित घटनेसंबधी प्लॅन तयार करण्यात येत आहे.'
4 / 9
कोरोनामुक्त ब्रिटन पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, काहीतरी चुकल्यास काय केले जाईल, याविषयी डॉक्टरांनी पूर्ण योजना आखली होती.
5 / 9
बोरिस जॉन्सन यांना सुद्धा आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. हॉस्पिटलमधील उपचारासंदर्भात माहिती देताना बोरिस जॉन्सन म्हणाले, मॉनिटरवर दिसणारा इंडिकेटर सतत चुकीच्या दिशेने जात होता. यावेळी समजले की कोरोनावर कोणताही उपचार नाही.
6 / 9
गेल्या महिन्यात बोरिस जॉन्सन हे लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये कोरोनाशी झुंज देत होते. त्यावेळी उपचारादरम्यान बोरिस जॉन्सन स्वत: लाच या परिस्थितीतून कसे बाहेर पडता येईल, याबद्दल सतत प्रश्न विचारत होते.
7 / 9
काही दिवसांत माझी तब्येत कशी खराब झाली, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. मला आठवते की मी निराश झालो होतो. मी या आजारापासून का बरे होत नाही, हे मला समजू शकले नाही, असे बोरिस जॉन्सन यांनी सांगितले.
8 / 9
दरम्यान, कोरोनापासून बरे झाल्यानंतर बोरिस जॉन्सन यांना मुलगा झाल्याची देखील आनंदाची बातमी मिळाली. त्यांची जोडीदार कॅरी सायमंड्सने लंडनमधील हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला.
9 / 9
बोरिस जॉन्सन यांनी आपल्या मुलाचे नाव त्यांना कोरोनापासून वाचवणाऱ्या डॉक्टराच्या नावावरून ठेवले आहे. जॉन्सन आणि कॅरी यांनी आपले आजोबा आणि दोन डॉक्टरांच्या नावावरून मुलाचे नाव विल्फ्रेड लॉरी निकोलस ठेवले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर