शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनानं आतापर्यंत बदललीयेत शेकडो रुपं, वैज्ञानिकांचे हात अद्यापही रिकामेच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 4:32 PM

1 / 10
CoronaVirus : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार घातला आहे. या व्हायरसच्या बदलत्या रुपांमुळे जगभरातील वैज्ञानिकही आश्चर्यचकित आहेत. या व्हायरससंदर्भात आतापर्यंत शेकडो प्रकारच्या चर्चा झाल्या आहेत. मात्र, अद्याप वैज्ञानिकांना कुठल्याही प्रकारच्या ठोस निर्णयापर्यंत पोहोचता आलेले नाही. नुकताच इस्रायलने कोरोनावरील लस शोधल्याचा दावा केला आहे.
2 / 10
कोरोनाच्या अनेक रुपांची पटलीये ओळख - आतापर्यंत वैज्ञानिकांनी कोरोनाची निर्मिती करणारी अनेक रुपं शोधली आहेत. मात्र, याचा फायदा आणि कोरोनावरील व्हॅक्सीन कितपत परिणामकारक ठरेल हे अद्याप त्यांना समजलेले नाही.
3 / 10
खरा प्रश्नतर राहिलेलाच - संशोधकांना अद्याप हे कळू शकलेले नाही, की या व्हायरसचे कोणते रूप कोविड-19ला एवढे घातक आणि संक्रमक बनवते.
4 / 10
D614G हे सर्वात घातक रूप? अमेरिक झालेल्या सुरुवातीच्या निष्कर्शात हे समोर आले आहे, की कोरोना व्हायरसचे D614G हे रुप सर्वात शक्तीशाली आणि घातक आहे. हे रुप कोविड-19ला अधिक संक्रमक बनवते. मात्र वैज्ञानिकांनी ना याचा रिव्हिव केला आहे. ना हे संशोधन कुठे छापून आले आहे.
5 / 10
कोरोनाची किती रुपं? शोध आजूनही सुरूच - अमेरिकेतील लॉस ऐलामोस नॅशनल लॅबोरेटरी न्यू मॅक्सिकोमध्ये काही वैज्ञानिक कोरोनाला सर्वात घातक बनवणाऱ्या रुपाचा शोध घेत आहेत. हे वैज्ञानिक ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लुएंजा डेटाचा डेटाबेस यूज करून कोरोनाची तोड शोधण्याच्या कामात लागले आहेत.
6 / 10
ब्रिटनमधील वैज्ञानिकांना आढळले कोरोनाचे 198 रुपं यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या एका संशोधनात कोरोनाची तब्बल 198 वेगवेगळी रुपं आढळून आली आहेत. या संशोधनात सहभागी असलेले एक प्रोफेसर फ्रांकोस बॅलोक्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, रूप बदलणे वाईट नाही. मात्र, कोरोना ज्या पद्धतीने रुप बदलत आहे. त्यावरून SARS-CoV2 अपेक्षेपेक्षा वेगाने रूप बदलतो, की हळूवार? हे अद्याप समजू शकलेले नाही.
7 / 10
यूनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोचे संशोधन - यूनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोतील संशोधकही कोरोना व्हायरसच्या बदलत्या रुपांवर संशोधन करत आहेत. त्यांच्या मते, कोरोनाचा केवळ एकच प्रकार असा आहे, जो संक्रमण पसरवत आहे.
8 / 10
कोरोनाची रुपं शोधण्यामागचा हेतू काय? जगातील अनेक देशांतील वैज्ञानिक कोरोनाच्या, अशा एका रुपाच्या शोध घेत आहेत, जे सर्वात घातक आहे. यामुळे कोरोनाची अचूक लस तयार करण्यास मदत होईल.
9 / 10
व्हॅक्सीनच्या तयारीत लागले आहेत वैज्ञानिक - जगातील वैज्ञनिक सध्या कोरोनावरील लस तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. सध्या सर्व वैज्ञानिकाचे एकच धेय आहे, ते म्हणजे, कोरोनाचे जे रूप सर्वात धोकादायक आहे. त्याचा शोध घेणे. या व्हायरसवरील रामबाण उपचार शोधणे हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. मात्र, कोरोनाच्या योग्य रुपाची ओळक पटली नाही, तर याच्या उपचारासाठी तयार झालेली व्हॅक्सीनही अकार्यक्षण ठरू शकते.
10 / 10
अजूनही बराच काळ लागेल! व्हायरसच्या जिनोममधील बदलामुळे काय होईल. याची ठोस माहिती अद्याप वैज्ञानिकांकडे नाही. खरेतर जीनोम, सिक्वेंसिंग व्हायरसच्या डीएनए आणि आरएनएमध्ये उपस्थित अनुवांशिक सूचना समजून घेण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. यामुळे कुठल्याही संक्रमित व्यक्तीमध्ये हा व्हायरस कुठून आला याची माहिती मिळते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याscienceविज्ञानAmericaअमेरिकाIsraelइस्रायल