शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : भारताच्या 'गेमचेंजर' औषधानं केलं निराश; जगभरात होता आशेचा किरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 1:13 PM

1 / 14
कोरोनाच्या उपचारात वापर होत असलेल्या मलेरियाच्या औषधासंदर्भात एक नवीन अभ्यास समोर आला आहे.
2 / 14
कोरोना विषाणूच्या रुग्णांना हे औषध कोणत्याही प्रकारचा लाभ देत असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असं अभ्यासामध्ये म्हटले आहे.
3 / 14
हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधावर करण्यात आलेला हा अभ्यास न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
4 / 14
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या औषधाचे वर्णन गेम चेंजर म्हणून केले होते, तसेच बरेच देश भारतातून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आयात करीत आहेत.
5 / 14
कोलंबियामधील विद्यापीठात सुमारे 1,400 उपचार घेणाऱ्या रुग्णांवर याचा अभ्यास करण्यात आला असल्याचे संशोधकांनी सांगितले.
6 / 14
संशोधनात असे दिसून आले आहे की, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन कोरोना रुग्णांमध्ये मृत्यूची जोखीम कमी करत नाही किंवा तसेच श्वासोच्छवासाची समस्याही सोडवत नाही.
7 / 14
हा अभ्यास कोणत्याही प्रयोगासाठी नव्हे तर केवळ निरीक्षणासाठी करण्यात आला आहे.
8 / 14
काही डॉक्टरांनी असे लिहिले आहे की, हा अभ्यास अनेक महत्त्वपूर्ण सूचना देतो आणि त्यामधून कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांवर बरेच महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात.
9 / 14
डॉक्टरांनी अभ्यासात लिहिले आहे की, 'हे निराशाजनक आहे की इतक्या दिवसानंतरही या साथीच्या रोगावर औषध तयार करण्यात आलेलं नाही.
10 / 14
त्याचदरम्यान हा नवीन अभ्यास हे दर्शवितो की, हायड्रोक्सीक्लोरोक्विन एक रामबाण औषध नाही.
11 / 14
या अभ्यासाच्या सुरुवातीस, हृदयाचा ठोका वाढणे आणि अचानक मृत्यू ओढावण्यासारखे गंभीर दुष्परिणाम सांगितले गेले होते.
12 / 14
अमेरिकेच्या फूड अ‍ॅण्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशननेही कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी हे औषध न वापरण्याचा इशारा दिला आहे.
13 / 14
अमेरिकेमध्ये कोरोनाचं थैमान वाढत चाललं असून, तिथले वैज्ञानिक त्यावर लस विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत.
14 / 14
अमेरिकेमध्ये कोरोनाचं थैमान वाढत चाललं असून, तिथले वैज्ञानिक त्यावर लस विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या