CoronaVirus Live Updates : भीषण! चीन पाठोपाठ आता 'या' देशात कोरोनाचा हाहाकार; एका दिवसात तब्बल 6 लाख नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 14:40 IST
1 / 14कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 46 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनामुळे काही देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 / 14चीनपाठोपाठ आता दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाचा भयावह वेग पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला आहे. नवा उच्चांक गाठला आहे. 3 / 14दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचे एका दिवसांत तब्बल 6 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जगातील कोणत्याही देशात एकाच दिवसात कोरोना संसर्गाची इतकी प्रकरणे समोर आलेली नाहीत. 4 / 14दक्षिण कोरिया हा व्हायरसमुळे सर्वात कमी मृत्यूदर असलेल्या देशांमधील एक देश आहे. सर्वसाधारणपणे, कोरोना संसर्गाचा दर जसजसा वाढत जातो, तसतसा त्याचा मृत्यूही वाढतो, परंतु दक्षिण कोरियामध्ये असे दिसून आले नाही.5 / 14कोरियाच्या व्हायरस फायटर्सचे म्हणणं आहे की, देशात मोठ्या प्रमाणावर सातत्याने कोविड चाचणी होत असल्याने संसर्गाची इतकी प्रकरणे समोर आली आहेत. कोरियन प्रशासनाने संक्रमित व्यक्तीची प्रकृती गंभीर होण्यापूर्वी जोखीम असलेल्या प्रकरणांची ओळख पटवून रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.6 / 14दक्षिण कोरियामध्ये लसीकरण दर 88% आहे. यासोबतच जगातील सर्वाधिक बूस्टर शॉट्स असलेल्या देशांमध्येही त्याचा समावेश आहे. विशेषत: वृद्धांना येथे मोठ्या प्रमाणात बूस्टर डोस देण्यात आला आहे. 7 / 14अत्याधुनिक लसीकरणामुळे येथील मृत्यूदर 0.14% वर आला आहे, जो दोन महिन्यांपूर्वी 0.88% होता. सध्याचा मृत्यू दर यूएस आणि यूके दरांच्या एक दशांश आहे, जरी त्याच कालावधीत संसर्गाची प्रकरणे 80 पट वाढली आहेत.8 / 14कोरियाने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अपारंपरिक धोरणावर काम केले आहे. भूतकाळातील महामारीपासून शिकलेल्या धड्यांचा वापर करून, देशाने लवकर चाचणी आणि उच्च-तंत्र संपर्क ट्रेसिंगचा वापर केला. 9 / 142020 च्या सुरुवातीपासून येथे 8 दशलक्षांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, परंतु कोरियाने कधीही लॉकडाऊन लादले नाही. बूस्टरच्या पुरवठ्याला प्राधान्य देण्यासाठी त्या पहिल्या शॉट्सच्या पलीकडे पाहून लसीकरणाच्या संथ सुरुवातीवर मात करण्यात यशस्वी झाले. 10 / 14वृद्धांना लक्ष्य करून वापरल्या जाणार्या बूस्टर डोसच्या पुरवठ्यावर भर देण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंगचा वापर केला जात आहे. एका हिदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 14जगभरातील अनेक देशांत पुन्हा एकदा संसर्ग वाढू लागला आहे. चीनमध्ये कोरोनाने सर्व रेकॉर्ड मोडले असून आता युरोपमध्ये ही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी Omicron चा सब-व्हेरिएंट BA.2 मुळे पुन्हा एकदा संसर्ग वाढत असून तो आतापर्यंतचा सर्वात घातक व्हेरिएंट असल्याचं म्हटलं आहे.12 / 14WHO ने दिलेल्या माहितीनुसार, Omicron चे 5 सब-व्हेरिएंट आहेत. BA.1, BA.1.1, BA.2, BA.2.2 आणि BA.3. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान जगभरात अनेक ठिकाणी BA.2 ची प्रकरणं समोर आली आहेत. BA.2 चा सर्वात पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळला होता.13 / 14कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा परिणाम फक्त चीन आणि युरोप पुरताच मर्यादित राहणार नाही. जगात रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तो घातक असल्याचं म्हटलं जातं अशा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.14 / 14WHO चे माजी सदस्य एंड्रियन एस्टरमॅन यांनी ट्वीट केलंय की, BA.1 च्या तुलनेत BA.2 हा 1.4 पट अधिक संसर्ग वाढवतो आहे. BA.2 हा व्हेरिएंट कमीत कमी 12 लोकांचा संक्रमित करू शकतो.