By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 18:48 IST
1 / 12जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. अनेक देश कोरोनाचा संकटाचा सामना करत असून काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 / 12कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र याच दरम्यान निष्काळजीपणा हा जीवघेणा ठरू शकतो. मास्क न लावणे, सोशल डिस्टंसिंग आणि नियमावलीचं पालन न करणं यामुळे वेगाने कोरोनाचा प्रसार होत असल्याचं समोर आलं आहे. 3 / 12न्यूयॉर्कच्या आरोग्य विभागाने केलेल्या एका रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आला आहे. यामध्ये डेल्टा व्हेरिएंटचा वेगाने प्रसार होत असताना कोरोना लसीच्या प्रभावावर रिसर्च करण्यात आला. यामध्ये रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांचा समावेश होता. 4 / 12रिसर्चनुसार, फायजर-बायोएनटेक, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचा प्रभाव 25 टक्क्यांनी कमी झाला आहे. मात्र तरी देखील कोरोना लस घेतलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी असल्याचं समोर आलं आहे. 5 / 12न्यूयॉर्कमधील जवळपास 88 लाख लोकांचा या रिसर्चमध्ये समावेश करण्यात आला होता. यातील अनेकांनी कोरोनाची लस घेतली होती. यामधील अनेकांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली होती. कोरोना नियमावलीचं पालन होत नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 6 / 12कोरोना लसीचे दोन लस घेतलेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क शिवाय फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग देखील काही ठिकाणी पाळलं जात नसल्याने त्याचा हा विपरित परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 7 / 12भारतातही सणसमारंभामध्ये निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहितीही याआधी समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. याच दरम्यान आता केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.8 / 12देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. सणसमारंभाच्या काळात पुढील तीन महिने अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत.9 / 12केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात अजूनही कोरोना व्हायरसची दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही. काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनाचा प्रसार कायम आहे. ज्या राज्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत, तिथेही कोरोना प्रसाराबाबत इशारा दिला गेला आहे.10 / 12कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या जाणाऱ्या क्षेत्रांत जिथे कोरोना संक्रमणाचा दर 5 टक्क्यापेक्षा अधिक आहेत तिथे सार्वजनिक कार्यक्रम टाळावे लागतील. ज्या क्षेत्रांमध्ये हा दर 5 टक्क्यापेक्षा कमी आहे, तिथे कार्यक्रमाआधी परवानगी घेणं गरजेचं असेल. रुग्णसंख्येतील वाढ आणि घट यावर त्या क्षेत्रातील निर्बंध आणि सूट याबाबतचे नियम ठरवले जातील.11 / 12तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन महिन्यांत अनेक सण येणार आहेत. याच दरम्यान काही समारंभाचं देखील आयोजन करण्यात येईल. मात्र यामुळेच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी होईल आणि हेच कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण ठरू शकतं. त्यामुळे या काळात लोकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे.12 / 12घरच्या घरीच सण साजरे करा. सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. सणांच्या काळात लोकांचा हलगर्जीपणा चिंता वाढवू शकतो. त्यामुळचे कोरोना नियमांचं पालन करा असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यातच डेल्टा व्हेरिएंट देखील थैमान घालू शकतो.