CoronaVirus Live Updates : युरोपमध्ये कोरोनाचा प्रकोप! डिसेंबरपर्यंत 2 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता; WHO ने व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 12:06 IST
1 / 13जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 21 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 217,901,675 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 4,523,766 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 13कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने सर्वांचंच टेन्शन वाढलं आहे. अनेक प्रगत देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.3 / 13युरोपमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळणार आहे. डिसेंबरपर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांच्या मृत्यूची शक्यता वर्तवण्यात येत आहे. WHO ने ही भीती व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युरोपियन देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. 4 / 13जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी 1 डिसेंबरपर्यंत युरोपमध्ये सुमारे 2 लाख 36 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो अशी भीतीही व्यक्त केली आहे. यावेळी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने कहर केला असून रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. 5 / 13युरोपमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 1.3 मिलियन लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागे तीन कारण असल्याचं म्हटलं जात आहे. उच्च ट्रान्समिशन दर, लसीकरणाचा मंदावलेला वेग आणि निर्बंधांमध्ये दिलेली सूट याचा यामध्ये समावेश आहे. 6 / 13कोरोना संक्रमणाचा उच्च प्रसार अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगून डॉ. हँस क्लेग यांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोप क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या 53 देशांपैकी 33 देशांमध्ये गेल्या दोन आठवड्यात 10 टक्के किंवा त्याहून अधिक वाढ झाली आहे. डेल्टा व्हेरिएंट हे मागचं मुख्य कारण आहे. 7 / 13युरोपच्या जवळजवळ अर्ध्या लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण झाले असले तरी लस घेणाऱ्या लोकांची संख्या आता मंदावली आहे. गरीब युरोपियन देशांमध्ये लसीकरणाचे दर कमी आहेत, निर्बंधांमध्ये सूट आणि लोकांच्या परदेश प्रवासात झालेली वाढ व्हायरसच्या प्रसारास कारणीभूत ठरली आहे.8 / 13युरोपमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. सातत्याने रुग्णांची संख्या वाढल्याने तज्ज्ञांनी देखील धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 13जगभरात संशोधन सुरू असून त्यातून नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट आता समोर आला आहे. हा व्हेरिएंट घातक असून लसही कुचकामी ठरत असल्याचं म्हटलं आहे. कोरोना लस घेतल्यावरही मोठा धोका असल्याचा खुलासा रिसर्चमधून करण्यात आला आहे. 10 / 13वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण आफ्रिका आणि अन्य काही देशांमध्ये कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट वेगाने पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लसीकरणानंतरही या व्हेरिएंटचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. 11 / 13दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकबल डिजीस (एनआयसीडी) आणि क्वाझुलु नेटाल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्मच्या शास्त्रज्ञांना पहिल्यांदा या विषाणूची माहिती मिळाली होती. या विषाणूच्या व्हेरिएंटला C.1.2 असं नाव देण्यात आलं आहे. 12 / 13दक्षिण आफ्रिकेत नव्या व्हेरिएंटने प्रभावित लोकांची संख्या वाढत आहे. मे महिन्यात सर्वप्रथम हा व्हेरिएंट पाहण्यात आला. त्यानंतर आता नवा व्हेरिएंट चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंडमध्ये आढळून आला आहे. नव्या व्हेरिएंटबाबत चिंता वाढली आहे. 13 / 13C.1 च्या तुलनेत नवा व्हेरिएंट म्यूटेट आहे. रिसर्चमध्ये दक्षिण आफ्रिकेत आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत C.1 व्हेरिएंट आढलून आला होता. तो आता म्युटेट होऊन C.1.2 झाला आहे. आफ्रिकेत गेल्या वर्षी आढळून आलेले व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकी व्हेरिएंटच्या नावाने ओळखले जात होते. मात्र नंतर जागतिक आरोग्य संघटनेने यांच नामकरण केलं आहे.