coronavirus : किम जोंगने कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना दिला अजब सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 18:08 IST
1 / 7कोरोना विषाणूचा फैलाव जगभरात वेगाने होत आहे. जगातील अनेक बडे देश कोरोनाशी झुंजत असताना उत्तर कोरियामध्ये मात्र एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. 2 / 7मात्र असे असले तरी उत्तर कोरियामध्ये नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही सूचना केल्या जात आहेत. 3 / 7हुकूमशहा किम जोंग ऊन ची सत्ता असलेल्या उत्तर कोरियामध्ये नागरिकांना कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न घेण्याची सूचना देण्यात आली आहे.4 / 7रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला कोरियन नागरिकांना देण्यात आला आहे.5 / 7 रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पारंपरिक भोजन घेण्याचा तसेच आहारात लसूण, कांदा अशा पदार्थांचा अधिक समावेश करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 6 / 7 गेल्या आठवड्यापासून जगभरात कोरोनाच्या फैलावाचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनाचे 14 लाख रुग्ण सापडले आहेत. तसेच सुमारे 80 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.7 / 7उत्तर कोरियन जनतेचा बाहेरील जगाशी फारसा संबंध येत नाही. तसेच चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर देशाच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या. त्यामुळे उत्तर कोरिया कोरोनाच्या प्रकोपापासून बचावला आहे.