शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus: चीनची आता खैर नाही, कोरोना पूर्णत: मानवनिर्मितच; वैज्ञानिकांना मिळाले महत्वाचे पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 6:42 PM

1 / 8
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल १७ कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
2 / 8
कोरोनानं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतल्यानंतर आता कोरोना विषाणूची निर्मिती कशी झाली याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. अनेकांनी चीनने कोरोनाची निर्मिती केल्याचे आरोप केले. मात्र वेळोवेळी चीनकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले. मात्र याच दरम्यान पुन्हा एकदा कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
3 / 8
ब्रिटनचे प्रोफेसर अँगल डल्गलिश आणि नॉर्वेचे शास्त्रज्ञ डॉ. बिर्गर यांनी कोरोना विषाणूची निर्मिती चीनच्या वुहान लॅबमध्येच झाली असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.
4 / 8
कोरोना विषाणूचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासात धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाल्याचा दावा त्यांनी आपल्या अहवालात केला आहे. कोरोना विषाणू तयार केल्यानंतर आपलं काळं कृत्य लपवण्यासाठी चीननं रेट्रो इंजिनियरिंगचा वापर केला. तसेच हा विषाणू मानवनिर्मित नसून वटवाघुळातून पसरल्याचं भासवलं. मात्र मानवी हस्तक्षेपाशिवाय विषाणू तयार होऊच शकत नाही असा दावा देखील वैज्ञानिकांकडून करण्यात आला आहे.
5 / 8
डेली मेलच्या वृत्तानूसार, कोरोना विषाणूचे कोणतेही नैसर्गिक गुणधर्म नाहीत. त्यामुळे हा पूर्णत: मानवनिर्मित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच गेन ऑफ फंक्शन या प्रकल्पात याची निर्मिती केली गेली आहे.
6 / 8
चीनने गुहेतील वटवाघुळामधून करोनाचा बॅकबोन घेतले आणि त्यावर स्पाईक टाकत त्या विषाणूला अधिक घातक केलं. त्यामुळे त्या विषाणूत मानवी हस्तक्षेप असल्याचे काही गुणधर्म आढळून आले असल्याने तो लॅबमध्येच तयार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. कोरोना व्हॅक्सिन निर्मितीसाठी अभ्यास करताना हा खुलासा झाला.
7 / 8
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमनं जानेवारी महिन्यात वुहानचा दौरा केला होता. तेव्हा त्या टीमने कोरोनाची निर्मिती नैसर्गिकरित्या झाल्याचा दावा केला होता.
8 / 8
जगभरात १७ कोटी १ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १५ कोटी २० लाख रुग्ण बरे झाले आहेत. तसेच ३५ लाख ३८ हजार जणांचा बळी गेला आहे. जगात १ कोटी ४४ लाख कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अमेरिकेमध्ये ३ कोटी ४० लाख रुग्ण आहेत. त्यातील २ कोटी ७७ लाख जण बरे झाले आहेत तर ५६ लाख ४६ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या देशात कोरोनामुळे ६ लाख ८ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझिलमध्ये १ कोटी ६३ लाख कोरोना रुग्ण आहेत व ४ लाख ५९ हजार लोकांचा बळी गेला. ही संख्या भारतातील बळींपेक्षा अधिक आहे.
टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या