शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: आतापर्यंत सुरक्षित असलेल्या पृथ्वीवरील या भागांत कोरोनाचा शिरकाव, संसर्गाची भीती वाढली

By बाळकृष्ण परब | Updated: November 14, 2020 18:46 IST

1 / 6
कोरोना विषाणूला जागतिक साथ म्हणून घोषित होऊत आता सुमारे आठ महिने होत आले आहेत. या आठ महिन्यांच्या काळात कोरोनाने संपूर्ण जगात आपले हातपाय पसरले. मात्र एवढ्या प्रदीर्घ काळानंतरही काही देश कोरोनापासून सुरक्षित होते. मात्र आता या देशांमध्येही कोरोनाने शिकराव केला आहे.
2 / 6
पॅसिफिक महासागरातील देश असलेल्या वानुआटूमध्ये गेल्या बुधवारी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. त्याबरोबरच मार्शल आयलँड्स आणि सोलोमन आयलँड्स येथेही कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
3 / 6
सामोआ आयलँड्समधये कोरोना पॉझिटिव्हू क्रू मेंबर्स असलेल्या जहाजाची सर्व्हिस केल्यानंतर स्थानिक कर्मचाऱ्याला क्वारेंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. Time.Com च्या रिपोर्टनुसार आता पृथ्वीवर केवळ ९ देश उरले आहेत जिथे कोरोनाचे रुग्ण सापडलेले नाही. मात्र यामध्ये उत्तप कोरिया आणि तुर्कमेनिस्तानचा समावेश करण्यात आलेला नाही. या देशांमध्ये कोरोना विषाणू पोहोचला आहे. मात्र त्याबाबत अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आलेली नाही.
4 / 6
पॅसिफिक महासागरातील विविध बेटांवर वसलेल्या देशांनी कोरोना विषाणूच्या फैलावास सुरुवात झाल्यानंतर आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या होत्या. मात्र आता हे देश कुठल्या ना कुठल्या प्रकारे कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडत चालले आहेत. वानुआटूच्या आरोग्य विभागाने सांगितले की, अमेरिकेतून परतल्यानंतर एक २३ वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह सापडून आला आहे.
5 / 6
सोलोमन आयलँड्सवर पहिला रुग्ण ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला आला होता. त्यानंतर इतक काही लोकांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले होते. दरम्यान, या छोट्या बेटांवर फैलाव होऊन रुग्ण वाढले तर त्याला नियंत्रणात आणणे स्थानिक प्रशासनाला कठीण जाणार आहे. कारण असा देशांमधील आरोग्य सेवा या खूप मर्यादित आहेत.
6 / 6
दरम्यान, सध्या जगभरातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ५ कोटी ३८ लाख पेक्षा अधिक झाली आहे. तर १३ लाख ११ हजार हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे सर्वाधिक २ लाख ४९ हजार मृत्यू हे अमेरिकेत झाले आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य