1 / 12कोरोनाच्या उत्पत्तीसाठी अमेरिका वारंवार चीनला जबाबदार धरत आहे. चीननं कोरोना विषाणूची माहिती जगापासून लपवल्याचाही आरोपही अनेक देशांकडून केला जात आहे. 2 / 12. विशेष म्हणजे कोरोनाचा जगभरात फैलाव झाल्यानं चीननं अनेक देशांना संकटात ढकललं. आता चीननंच कोरोनाला संपवणारी अँटीबॉडी विकसित केल्याचा दावा केला आहे. 3 / 12कोरोना विषाणूचा नाश करण्यास सक्षम ह्युमन न्यूट्रोलायझिंग अँटीबॉडीचा शोध लावला आहे, असा दावा चिनी वैज्ञानिकांनी केला आहे. 4 / 12या अँटीबॉडीमुळे कोरोनावर औषध तयार करण्यासाठी आणि त्यावर चालू असलेल्या संशोधनात मदत मिळणार आहे. 5 / 12नेचर वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या लेखानुसार, चिनी अकॅडमी ऑफ सायन्सच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने, मानवी न्यूट्रोफिलिझिंग अँटीबॉडीज शोधून काढल्या आहेत, ज्या कोरोना विषाणूचा प्रभावीपणे उपचार करू शकतात. 6 / 12चिनी शास्त्रज्ञांनी देखील त्याच्या क्लिनिकल चाचणीची तयारी सुरू केली आहे. शास्त्रज्ञांनीही त्याच्या पेटंटसाठी अर्ज सादर केला आहे. 7 / 12मायक्रोबायोलॉजी इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, हे अँटीबॉडी संशोधनातून चिनी वैज्ञानिकांनी स्वतंत्रपणे शोधले आहेत.8 / 12भविष्यात या अँटीबॉडीसंदर्भात बर्याच क्लिनिकल चाचण्या केल्या जातील. विशेष म्हणजे यानंतर त्याचे औद्योगिक उत्पादन देखील सुरू केले जाणार आहे. 9 / 12यान जिंहुआ, गाओ फू आणि वांग किहुई यांच्या नेतृत्वात इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबायोलॉजीच्या पथकांनी यासंदर्भातील संशोधनावर एक पत्र तयार केले आहे. 10 / 12ज्यामध्ये असे लिहिले आहे की, संस्थेने कोरोना विषाणूवर जानेवारीपासूनच संशोधन सुरू केले. कोरोना विषाणूच्या रुग्णांकडून घेतलेल्या सिरमचा वापर करून डझनभर मानवी न्यूट्रोलायझिंग अँटीबॉडीज सापडले.11 / 12चाचणीदरम्यान, शास्त्रज्ञांना आढळले की, यापैकी दोन अँटीबॉडीज कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यात पूर्णपणे यशस्वी आहेत. माकडांवर झालेल्या चाचणीत या अँटीबॉडीने त्यांची श्वसन प्रणाली पूर्णपणे सुधारली. 12 / 12शास्त्रज्ञांनी सांगितले की अँटीबॉडीजच्या विकासासाठी तंत्रज्ञान हस्तांतरित झाल्यानंतर त्यावर क्लिनिकली चाचण्या घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात येणार आहे.