1 / 10कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 53 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 530,504,355 वर पोहोचली आहे. तर 6,308,295 लोकांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 10कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. उपचारानंतर जवळपास 501,108,775 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. चीनमधून उद्भवलेल्या कोरोनाचा संसर्ग अडीच वर्षांनंतरही संकट म्हणून कायम आहे. 3 / 10जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) गेल्या आठवड्यात जगभरात कोरोनाची 37 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 9 हजार मृत्यू झाले आहेत. डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की जानेवारीमध्ये पीक वर असलेल्या कोरोनाचे नवीन रुग्ण आणि मृत्यू कमी होत आहेत.4 / 10WHO म्हणण्यानुसार, अमेरिका आणि वेस्टर्न पॅसिफिक या जगातील फक्त दोनच प्रदेशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. त्याच वेळी, मीडल ईस्टमधील मृत्यूच्या संख्येत 30% वाढ झाली आहे. इतरत्र, कोरोनाचा संसर्ग एकतर स्थिर आहे किंवा प्रकरणे कमी होत आहेत.5 / 10ओमायक्रॉनचे सर्व सब-व्हेरिएंट 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' म्हणून ट्रॅक केले जात आहेत. एजन्सीने म्हटले आहे की, ज्या देशांमध्ये BA.2 मुळे नवीन लाट आली होती, तेथे BA.4 आणि BA.5 चा कमी परिणाम झाला आहे.6 / 10डरबनमधील क्वाझुलु-नताल विद्यापीठातील संसर्गजन्य रोग तज्ञ सलीम अब्दुल करीम यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत BA.4 आणि BA.5 मुळे आलेली नवी लाट आता थांबलेली दिसते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेतच ओमायक्रॉनचे पहिले प्रकरण समोर आले होते7 / 10जूनमध्ये ओमायक्रॉनमध्ये म्यूटेशन होण्याची भीती करीम यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ओमाय़क्रॉनमध्ये आतापर्यंत अनेक म्यूटेशन झाले असल्याने त्यात आणखी म्यूटेशन होण्याची शक्यता आहे.8 / 10कोरोनामुळे चीनमधील परिस्थिती अजूनही बिघडत चालली आहे. तिथे अजूनही करोडो लोक काही निर्बंधाखाली राहतात. राजधानी बीजिंगमध्ये अधिकाऱ्यांनी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना घरीच राहण्याचे आदेश दिले आहेत. 9 / 10सोमवारपासून य़ेथे सामूहिक चाचणीह म्हणजेच मास टेस्टिंग सुरू होणार आहे. बीजिंगमधील अनेक निवासी भागातील लोकांचा आवाज बंद करण्यात आला आहे. तथापि, शांघाईमध्ये लॉकडाऊन जितका कडक आहे, तितके इतर शहरांमध्ये अद्याप असे कोणतेही निर्बंध नाहीत. 10 / 10शांघाईमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून लाखो लोक कडक निर्बंधाखाली राहत आहेत. चीन अजूनही 'झिरो कोविड पॉलिसी'वर भर देत आहे. तर डब्ल्यूएचओने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी झिरो कोविड पॉलिसी फारशी प्रभावी नसल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.