Corona Virus: कोरोना नेमका आला कुठून? समितीनं अहवाल दिला, केली महत्वाची सूचना...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 08:37 IST
1 / 8तज्ज्ञांच्या समितीने अहवाल तयार केला असून त्याआधारे भविष्यात कोरोनासदृश महासाथ पसरली तर कशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापन करता येईल, हे ठरवले जाणार आहे. 2 / 8जागतिक आरोग्य संघटनेद्वारा नियुक्त तज्ज्ञांच्या समितीने कोरोना विषाणूच्या उगमाचा अभ्यास केला. जगभरातील २६ तज्ज्ञांचा समावेश असलेल्या या समितीचे नाव सायंटिफिक ॲडव्हायजरी ग्रुप फॉर ओरिजिन्स ऑफ नोव्हेल पॅथोजेन्स (सॅगो) असे आहे.3 / 8या समितीने कोरोनासंदर्भातील डब्ल्यूएचओचा चीनवरील अहवाल आणि अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेचा अहवाल यांचा अभ्यास केला. या दोन्ही अहावालांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वटवाघळांपासून झाल्याचे नमूद होते.4 / 8कोरोना विषाणूच्या उगमबाबतच्या नव्या अहवालात हा विषाणू पक्ष्यांपासून पसरला असण्याची शक्यता दाट आहे, असे नमूद आहे.5 / 8कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम आढळला चीनच्या वुहान शहरात. तथापि, मूळ कोणापासून हा विषाणू पसरला याची स्पष्टता अहवालात नाही.6 / 8कोरोनासारखी महासाथ भविष्यात आली तर त्यास तोंड कसे द्यायचे याची नियमावली तयार करणे हा मुख्य उद्देश आहे.7 / 8या प्रश्नाचे उत्तर मुख्यत: चीनकडून पुरेशा प्रमाणात न मिळालेला डेटा, असे आहे. चिनी शास्त्रज्ञांनी ४० हजार लोकांचे नमुने डब्ल्यूएचओकडे पाठवले. मात्र, त्यातून ठोस माहिती हाती लागू शकली नाही.8 / 8या सर्व गोंधळामुळे कोरोना विषाणूचा उगम नेमका कुठे झाला, याचे निश्चित उत्तर मिळू शकले नाही. कोरोनावरील सर्व देशांचा डेटा, अभ्यास अहवाल, निष्कर्ष यांचा अभ्यास समितीतर्फे सुरू आहे.