शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; बिजिंगमध्ये शाळा बंद, 'वर्क फ्रॉम होम' वर जोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 9:50 AM

1 / 7
चीनमध्ये कोरोना व्हायरसचा पुन्हा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. याठिकाणी अचानक कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. रविवारी एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला, यावरून येथील बिघडलेल्या परिस्थितीचा अंदाज लावता येतो.
2 / 7
सहा महिन्यांनंतर कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू होता. एवढेच नाही तर बाधितांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर चीन सरकारने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन केले आहे. तसेच, जास्तीत जास्त टेस्टिंग आणि क्वारंटाइनवरही भर दिला जात आहे.
3 / 7
चीनच्या आरोग्य विभागाने अधिकृतपणे 87 वर्षीय व्यक्तीच्या कोरोनामुळे मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. याशिवाय, सोमवारी बीजिंगमध्ये कोरोनाचे 962 नवीन रुग्ण आढळले. याच्या एक दिवस आधी 621 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती.
4 / 7
राष्ट्रीय आरोग्य आयोगाने रविवारी सांगितले की, चीनमध्ये गेल्या 24 तासांत 26,824 लोकांमध्ये कोरोनाची पुष्टी झाली आहे, जी एप्रिलच्या बरोबरीची आहे. हा धोका लक्षात घेऊन सरकारने बीजिंगमधील अनेक जिल्ह्यांतील शाळा बंद केल्या आहेत. येथे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
5 / 7
कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी चीन सरकारने लोकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यापासून रोखले आहे. सरकारी आदेशानुसार, रविवारी बीजिंगमधील अनेक शॉपिंग मॉल्स बंद ठेवण्यात आले होते, तर अनेक मॉल्स उघडण्याचे वेळेत बदल केले आहेत.
6 / 7
याशिवाय, अनेक रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करण्याची सुविधाही रद्द करण्यात आली आहे. चाओयांग जिल्हा अधिकार्‍यांनी येथील कंपन्यांना आपल्या कर्मचार्‍यांसाठी वर्क फ्रॉम होमची सुविधा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. काही उद्याने आणि जिमही पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.
7 / 7
चीनच्या ग्वांगझूमध्ये (Guangzhou) दररोज कोरोनाचे 8 हजार रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत सरकारने बैयून जिल्ह्यात पाच दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. बीजिंगमधील नवीन कोरोना निर्बंधांमुळे सोमवारी आशियातील जवळपास सर्व शेअर बाजार कोसळले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन