शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कंगाल पाकिस्ताननं मित्र चीनला लावला अब्जावधीचा चुना; जिनपिंग भडकले, काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 3:26 PM

1 / 10
पाकिस्तान आणि चीन दोघेही आयर्न ब्रदर्स असल्याचा दावा करतात पण आता त्यांची मैत्री आता धोक्यात आली आहे. कंगाल पाकिस्तान आता चीनसाठी डोकेदुखी बनला आहे.
2 / 10
चीनच्या वीज कंपन्यांनी पाकिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे पण आता त्यांचे पैसे परत मिळत नाहीयेत. चीन सरकारच्या अनेक इशाऱ्यांनंतरही पाकिस्तान सरकारने पैसे परत केले नाहीत, तेव्हा अनेक चिनी कंपन्यांनी इस्लामाबाद सोडले.
3 / 10
ही रक्कम सुमारे ४९३ अब्ज पाकिस्तानी रुपये असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तान सरकारने स्वतः कबूल केले आहे की ऊर्जा क्षेत्रातील चिनी कंपन्यांनी जानेवारी २०२४ मध्ये त्यांच्या गुंतवणुकीतून १७ कोटी डॉलर काढून घेतले आहेत. हा पाकिस्तानसाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय बनला आहे.
4 / 10
पाकिस्तानमधील CPEC प्रकल्पांतर्गत चीनने सुमारे ६२ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे आणि ती आणखी वाढवत आहे.
5 / 10
पाकिस्तानी पत्रकार कामरान युसूफ सांगतात की, चीन पाकिस्तानमध्ये खूप पैसा खर्च करत असताना, जो पैसा पाकिस्तानला परत करायला हवा होता तो परत केलेला नाही. पाकिस्तानवर आता चिनी ऊर्जा कंपन्यांचे सुमारे ४९३ अब्ज पाकिस्तानी रुपयांचे कर्ज आहे.
6 / 10
चीनच्या वीज कंपन्यांनी पाकिस्तानात कारखाने काढले होते आणि नंतर इस्लामाबाद सरकारला पैसे परत करावे लागणार होते. पाकिस्तान आपल्या लोकांकडून वीज बिल वसूल करू शकत नाही.
7 / 10
चीन आणि पाकिस्तानमध्ये एक करार झाला होता की जनतेकडून मिळणारे पैसे पाकिस्तान सरकार चीनला परत करेल पण तसे होऊ शकले नाही.
8 / 10
खुद्द चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी हा मुद्दा पाकिस्तान सरकारकडे जोरदारपणे मांडला होता पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यानंतर चीनच्या वीज कंपन्यांनी पाकिस्तान सोडणेच योग्य मानले.
9 / 10
कामरान म्हणाले की, आता पाकिस्तानमध्ये नवीन सरकार आले असून चीनला समजावणे सर्वात महत्त्वाचे असेल. शहाबाज सरकारला कठोर निर्णय घेणे फार कठीण जाईल.
10 / 10
अमेरिकेच्या मेरी युनिव्हर्सिटीच्या एड डेटाच्या अहवालानुसार, २००० ते २०२१ दरम्यान चीनचे पाकिस्तानवरील एकूण कर्ज ६७ अब्ज डॉलर होते. हे आधी नमूद केलेल्या आकडेवारीपेक्षा २१ अब्ज अधिक आहे.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीन