शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगभरातील या ऐतिहासिक वास्तूंची चीनने केली आहे सेम टू सेम कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 16:09 IST

1 / 9
गेल्या काही वर्षांत चीनने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. अगदी छोट्या यंत्रांपासून मोबाईल, विमाने, शस्त्रास्रे अशा विविध वस्तूंच्या निर्मितीत चीनने आघाडी घेतली आहे. एवढेच नव्हे तर आता जगभरातील अनेक ऐतिहासिक वास्तूंची सेम टू सेम कॉपी करण्याचीही किमया साधली आहे. अशाच काही वास्तूंचा घेतलेला हा आढावा.
2 / 9
आयफेल टॉवर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर फ्रान्सची राजधानी पॅरिस येते. मात्र चीनने हांगचोऊ शहरात खऱ्या आयफेल टॉवरची प्रतिकृती उभी केली आहे.
3 / 9
पिरॅमिड ही इजिप्तची ओळख. मात्र चीनने हुबेई प्रांतात अगदी खरेखुरे भासतील असे पिरॅमिड उभे केले आहेत.
4 / 9
कॅपिटल हिल अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमध्ये स्थित आहे. मात्र चीनने गुआंगदोंग प्रांतात कॅपिटल हिलची जशास तशी प्रतिकृती उभी केली आहे.
5 / 9
लंडन ब्रिज ही इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनची खास ओळख. मात्र चीनने सुचोऊ शहरात नदीवर याची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे.
6 / 9
हे छायाचित्र पाहिल्यानंतर कुणीही हे पॅरिसमधील लुव्रे म्युझियम आहे, असे सांगेल. मात्र आर्किटेक्ट आय. एम. पेई याने शेनचॅन प्रांतात लुव्रे म्युझियमची ही प्रतिकृती साकारली आहे.
7 / 9
व्हाइट हाऊस हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान. चीनने याचीही प्रतिकृती साकारली आहे. हे व्हाइट हाऊस एका अमेरिकन रियल इस्टेट कंपनीचे कार्यालय आहे. हे ठिकाण पाहण्यासाठी बरेच पर्यटक येत असतात.
8 / 9
पार्थेनन या ग्रीसमधील प्राचीन भव्य मंदिराची प्रतिकृतीही चीनमध्ये साकारली गेली आहे. गांसू प्रांतातील चानचोऊ येथे हे मंदिर उभे केले गेले आहे.
9 / 9
जागतिक वारसा घोषित केल्या गेलेल्या ऑस्ट्रियामधील हालस्टाट या गावाची प्रतिकृतीही चीनने उभी केली आहे. गुआंगडोंग प्रांतात चीनकडून हे गाव उभे केले गेले आहे.
टॅग्स :chinaचीनtourismपर्यटनInternationalआंतरराष्ट्रीय