1 / 11कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनला आता कोरोनानेच धडकी भरवली आहे. कोरोना व्हायरस नव्या रुपात आणि नव्या शहरात पोहोचला असून वाढत्या रुग्णांमुळे चीन हादरला आहे. 2 / 11रशियाच्या सीमेनजीक असलेल्या चीनच्या एका शहरामध्ये कोरोना व्हायरसने हजेरी लावली आहे. तसेच वुहानमध्येच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे आता चीनमध्ये कोरोना पसरण्याचा धोका वाढला आहे. 3 / 11चीनच्या अधिकाऱ्यांनी रविवारी उत्तर कोरिया आणि रशियाच्या सीमेला लागून असलेल्या शुलान शहराला कोरोनाचा धोका पाहून संपर्क तोडला आहे. एक कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आल्याने या शहरात अनेक रुग्ण सापडले आहेत. या महिलेच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीबाबत कोणालाच माहिती नाहीय.4 / 11चीनने गेल्याच आठवड्यात देशातील सर्व प्रांत कमी आणि मध्यम रिस्कमध्ये असल्याचा दावा केला होता. रविवारी राष्ट्रीय आरोग्य आयोगाने कोरोनाचे १७ नवीन रुग्ण नोंद केले. 5 / 11गेल्या दोन आठवड्यांपासून हा सलग दुसरा दिवस आहे की कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन अंकांमध्ये येत आहे. यामध्ये पाच रुग्ण रशिया आणि उत्तर कोरियाच्या सीमेवर असलेल्या भागामध्ये आढळले आहेत. 6 / 11जिलिन प्रांतामध्ये सापडलेले हे रुग्ण शुलान शहरातीलच होते. तर अन्य दोन हिलोंगिजियान आणि लायोनिंग प्रांतातील आहेत. जिलिन प्रांतामध्ये 28 वर्षीय महिला आणि 45 व ५६ वर्षीय दोन व्यक्ती कोरोनाबाधित झाले आहेत. 7 / 11चीनच्या स्थानिक मिडीयानुसार अधिकाऱ्यांनी शुलान शहरातील सर्व सार्वजनिक स्थळे बंद केली आहेत. तसेच स्पोर्टस फॅसिलिटी, सिनेमा आणि लायब्ररी सारख्या जागा सील केल्या आहेत. 8 / 11नागरिकांना लॉकडाऊनसारखे घरात राहण्यास सांगितले आहे. सार्वजनिक वाहनांवर बंदी असून टॅक्सी देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. 9 / 11नागरिकांना लॉकडाऊनसारखे घरात राहण्यास सांगितले आहे. सार्वजनिक वाहनांवर बंदी असून टॅक्सी देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. 10 / 11शुलान शहरामध्ये कोरोनाचे संक्रमण एक रहस्य बनले आहे. एका ४५ वर्षींय महिला पॉझिटिव्ह सापडली आहे. या महिलेला कोणापासून कोरोना झाला याची माहितीच प्रशासनाला मिळत नसल्याने चीनला धडकी भरली आहे. 11 / 11महत्वाचे म्हणजे रशियाला कोरोनाने घेरले असून उत्तर कोरियात मात्र एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याचे सांगितले जात आहे.