शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! परिस्थिती हाताळण्यासाठी पाठवलं सैन्य; 'या' देशात 2.6 कोटी लोकांची होणार टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 12:29 IST

1 / 12
चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे परिस्थिती गंभीर होत आहे. अनेक प्रांतांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. शांघाईमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या 9,006 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पीकनंतरची ही एक दिवसीय वाढ आहे.
2 / 12
जवळपास 2.6 कोटी लोकसंख्या असलेल्या शांघाई प्रांतातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चिनी सैन्य आणि तब्बल 2,000 हून अधिक वैद्यकीय कर्मचारी पाठवण्यात आले आहेत, जेणेकरून रूग्णांवर उपचार करता येतील.
3 / 12
चीनमध्ये संसर्गाची सर्वाधिक वाढ शांघाईमध्येच होत आहे. येथे दररोज कोविड-19 चे रुग्ण वाढत आहेत. त्याच वेळी, संक्रमणाची चेन थांबवण्यासाठी लॉकडाऊनमुळे लाखो लोक घरामध्येच बंद आहेत.
4 / 12
आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या रविवारी येथे संसर्गाच्या 438 नवीन प्रकरणांची पुष्टी झाली आहे. यासोबतच असे 7788 कोरोना संक्रमित आढळले आहेत ज्यांना संसर्गाची लक्षणे नव्हती.
5 / 12
अहवालानुसार, 2019 च्या अखेरीस वुहानमध्ये आढळलेल्या प्रकरणांनंतर शांघाईमध्ये दररोज येणारी प्रकरणे चीनमध्ये सर्वाधिक आहेत. शांघाईमधील 2.6 कोटी लोकसंख्येला दोन टप्प्यांत लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे.
6 / 12
चीन हा जगातील सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशांपैकी एक आहे. चीनमध्ये, 88% पेक्षा जास्त लोकांना कोरोना लसीचा डबल डोस मिळाला आहे, परंतु असे असूनही, चीनमधील केवळ 52% वृद्ध लोकांना म्हणजेच 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना डबल डोस मिळाला आहे.
7 / 12
परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की शांघाईमधील कोणत्याही रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यासाठी जागा उरलेली नाही. असे असूनही, चीनचा दावा आहे की शांघाईमध्ये आतापर्यंत एकाही व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला नाही.
8 / 12
चीनच्या मोठ्या व्यावसायिक हब शांघाईमध्ये येत्या शुक्रवारपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला. बँकिंग आणि इतर कामे विस्कळीत होऊ नयेत यासाठी शांघाईमधील सुमारे 20 हजार कर्मचारी कार्यालयात राहत आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था सरकारने केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
9 / 12
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, शांघाईच्या पूर्व पुडोंग भागात परिस्थिती खूपच गंभीर आहे. रिपोर्टमध्ये शांघाईच्या डोंगहाई एल्डरली केअर रुग्णालयात काम करणाऱ्या काही लोकांशी बोलल्यानंतर या परिस्थितीबद्दल सांगण्यात आले.
10 / 12
रुग्णालयात काम करणार्‍या लोकांनी सांगितले की ते वृद्ध रुग्णांवर उपचार करण्यासाठी संघर्ष करत आहेत, त्यापैकी अनेकांचा मृत्यूदेखील झाला. शांघाईच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात एका नर्सने तीन आठवड्यांपूर्वी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता असं म्हटलं आहे.
11 / 12
शांघाई सरकारने पाठवलेले वैद्यकीय कर्मचारी आणि तज्ज्ञांनाही संसर्ग झाल्याचा दावा त्यांनी केला. सुरुवातीला आम्ही नेहमीप्रमाणे काम करत राहिलो, पण नंतर त्यांनी प्रत्येक विभाग बंद करण्यास सुरुवात केली. तेव्हा आमच्या मॅनेजरने सांगितले की परिस्थिती खूप वाईट होत आहे. असे बरेच रुग्ण होते जे मास्क घालण्यासही नकार देत होते.
12 / 12
बीबीसीने मृतांची चौकशी करण्यासाठी स्थानिक स्मशानभूमीशीही संपर्क साधला. परंतु, रुग्णालयातून रुग्णांचा एकही मृतदेह पाठवण्यात आल्या नसल्याचे सर्वांनी सांगितले. शांघाई परराष्ट्र व्यवहार कार्यालयानेही कोरोनामुळे झालेल्या लोकांच्या मृत्यूवर भाष्य केलं नाही
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन