'या' देशात बांधले जगातील दुसरे सर्वात मोठे मंदिर; 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन, पाहा Photos...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 18:04 IST
1 / 7 Akshardham temple in US: सनातन धर्म किती महान आहे, हे त्याच्या जगभरातील लोकप्रियतेवरुन कळून जाते. भारतात सर्वाधिक हिंदू मंदिरे आहेत, पण जगभरातही अनेक ठिकाणी मंदिरे बांधली गेली आहेत. 2 / 7 कंबोडियातील अंगकोर येथे जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. आता लवकरच आणखी एका ठिकाणी जगातील दुसरे सर्वात मोठ्या मंदिराचे उद्घाटन होणार आहे.3 / 7 भारताबाहेर बांधण्यात आलेल्या जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे न्यू जर्सी येथे 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरच्या दक्षिणेस सुमारे 90 किमी अंतरावर किंवा वॉशिंग्टन डीसीच्या उत्तरेस 289 किमी अंतरावर असलेल्या रॉबिन्सविले टाऊनशिपमध्ये स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर बांधले गेले आहे.4 / 7 भारतीयांसाठी हा अतिशय ऐतिहासिक क्षण असणार आहे. 19व्या शतकातील हिंदू आध्यात्मिक संत भगवान स्वामीनारायण यांचे हे मंदिर अतिशय सुंदर आणि भव्य-दिव्य असणार आहे. 5 / 7 उद्घाटनाची तारीख जवळ आल्यामुळे मंदिराचे सौंदर्य आणखी वाढवण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. मंदिर बांधण्यासाठी यूएसमधील 12,500 स्वयंसेवकांचा सहभाग होता. मंदिर बांधण्यासाठी 12 वर्षे, म्हणजे 2011-2023 असा कालावधी लागला.6 / 7 अक्षरधाम मंदिर पौराणिक भारतीय संस्कृतीनुसार 183 एकरवर बांधले गेले आहे. मंदिर संकुलात भारतीय संगीत आणि नृत्य प्रकारांच्या कलाकृतींसह 10,000 शिल्पांचा समावेश आहे. 7 / 7 मंदिरात मुख्य मंदिरासह 12 उप-मंदिरे, 9 शिखरे (शिखरांसारखी रचना) आणि 9 पिरॅमिड असतीत. हे मंदिर पुढील हजार वर्षे टिकेल, अशा पद्धतीने डिझाइन केले आहे. या ऐतिहासिक मंदिराच्या उभारणीसाठी चुनखडी, गुलाबी वाळूचा खडक, संगमरवरी आणि ग्रॅनाइटचा वापर करण्यात आला आहे.