अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 20:53 IST
1 / 7अंतराळात मोठी दुर्घटना टळली आहे. चीनच्या स्पेस स्टेशनला एक मोठा ढिगारा धडकला. यामुळे क्रूचे नियोजित परतीचे वेळापत्रक आता बदलण्यात आले.2 / 7त्यांचे परतणे पुढे ढकलण्यात आले. अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अंतराळ संस्थेने म्हटले आहे.3 / 7चीन दर सहा महिन्यांनी स्टेशनच्या क्रूमध्ये बदल करतो. शनिवारी, क्रूला घेऊन जाणाऱ्या शेन्झोउ-२० अंतराळयानाने शेन्झोउ-२१ क्रूसह कक्षेत परतणे पूर्ण केले. 4 / 7हे क्रू बुधवारी पृथ्वीवर परतणार होते. पण, या घटनेमुळे आता यामध्येबदल केला आहे.5 / 7मंगळवारी स्थानकावरील तीन सदस्यांच्या क्रूने नवीन क्रूला अंतराळ स्थानकात प्रवेश दिला. शेन्झोउ-२० या तीन क्रू सदस्यांनी, चेन डोंग, चेन झोंगरुई आणि वांग जी यांनी त्यांची सर्व नियोजित कामे पूर्ण केली आहेत.6 / 7बुधवारी उत्तर चीनच्या इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेशातील डोंगफेंग लँडिंग साइटवर परतण्याचे नियोजन होते.7 / 7त्यांचे परतणे पुढे ढकलण्यात आले आहे. गेल्या शुक्रवारी, चीनने शेन्झोउ-२१ क्रूड स्पेसक्राफ्ट लाँच केले, यामध्ये तीन अंतराळवीरांना सहा महिन्यांच्या मोहिमेवर चिनी अंतराळ स्थानकात घेऊन गेले आहे.