China Virus: 15000 वर्षे जुन्या बर्फात सापडले 33 प्राचीन व्हायरस, शास्त्रज्ञही झाले चकीत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 18:09 IST
1 / 8 कोरोना व्हायरसने जगभर हाहाःकार माजवला आहे. जगभर कोरोना पसरल्यापासून अनेक शास्त्रज्ञ पृथ्वीवर असलेल्या विविध विषाणूंवर परिक्षण करुन नव-नवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.2 / 8 पण, अजूनही आपल्या शास्त्रज्ञांना या पृथ्वीवर असलेल्या सर्व विषाणूंबद्दल माहिती मिळाली नाहीये. नुकत्याच झालेल्या एका शोधातून हे सिद्ध झालंय.3 / 8या शोधादरम्यान शास्त्रज्ञांना चीनच्या तिबेटमध्ये 15 हजार वर्षे जुन्या बर्फामध्ये प्राचीन जिवंत विषाणू सापडले आहेत.4 / 8 हे विषाणू आतापर्यंत जगभरात आढळलेल्या विषाणूंपेक्षा वेगळे असून, इतक्या वर्षांपासून बर्फात असल्यामुळे हे अजूनही जिवंत आहेत. 5 / 8 संशोधकांनी सांगितले की, त्यांना हा व्हायरस तिबेटमधील अतिशय जुन्या बर्फाच्या डोंगरावर आढळला असून, त्या ठिकाणी या विषाणूची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे.6 / 8 या शोधाचा अहवाल मायक्रोबायोम जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या शोधातून शास्त्रज्ञांना विषाणूंच्या विकासाची महत्वपूर्ण माहिती मिळू शकेल.7 / 8 या शोधाचे प्रमुख लेखक आणि ओहियो स्टेट यूनिवर्सिटीचे संशोधक ब्रिड पोलर आणि क्लाइमेट रिसर्च सेंटरचे संशोधक झी-पिंग झोंग यांनी सांगितले की, पश्चिम चीनमधील बर्फाचा आतापर्यंत अभ्यास करण्यात आलेला नाही. या शोधातून अतिशय महत्वाची माहिती मिळू शकेल. 8 / 8 हे विषाणून समुद्र सपाटीपासून 22 हजार फुट उंचीवर असलेल्या बर्फात आढळले आहेत. संशोधकांना त्या ठिकाणी 33 प्रकारचे व्हायरस सापडले असून, सध्या या व्हायरसपासून किती धोका आहे हे येणाऱ्या काळात कळेल.