IPS बनण्यासाठी नाकारली IAS ची नोकरी; अभिनेत्रीपेक्षाही लय भारी आहे 'ही' सरकारी अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:26 IST
1 / 10UPSC परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस बनण्याचं स्वप्न हजारो युवक-युवती ठेवतात. बऱ्याचदा IAS होण्यासाठी बरेच जण धडपडत असतात. परंतु ही सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS न होता IPS बनण्याची जिद्द उराशी बाळगून आशना चौधरी यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.2 / 10यूपीएससीच्या पहिल्या दोन प्रयत्नात अपयश मिळाल्यानंतरही तिने हार मानली नाही. या अपयशातून शिकून पुढे जात स्वत:मध्ये सुधारणा करून आशना चौधरीनं तिला जे हवे ते मिळवलेच. आशना चौधरीला १२ वीत ९६.५ टक्के मिळाले होते. दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून तिने इंग्लिश लिटरेचरमध्ये पदवी घेतली.3 / 10यानंतर आशना चौधरी एशियन यूनिवर्सिटीतून इंटरनॅशनल रिलेशंसमध्ये मास्टर डिग्री घेतली. त्यावेळी एका NGO मध्ये आशना चौधरी हिने काम केले. ही सामाजिक संस्था वंचित घटकातील मुलांसाठी काम करते. २०१९ मध्ये आशना चौधरी हिने कुटुंबापासून प्रेरित होऊन नागरी सेवा परीक्षा देण्याची तयारी सुरू केली.4 / 10पहिल्या २ प्रयत्नात आशना चौधरी हिला UPSC परीक्षेत अपयश मिळाले. मात्र त्यानंतर या पराभवातून धडा घेत पुन्हा जिद्दीने तिने रणनीतीत बदल करून परीक्षा देण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली. चुका सुधारल्या, मॉक टेस्टसह सराव केला. त्यानंतर २०२२ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात आशना चौधरी यूपीएससीत उत्तीर्ण होऊन ११६ नंबर पटकावला. 5 / 10आशना चौधरीला हवं असते तर ती IAS साठी अर्ज भरू शकली असती परंतु तिने IAS न निवडता भारतीय पोलीस सेवेला प्राधान्य दिले. विना कोचिंग, केवळ स्वत: अभ्यास करून, रणनीती तयार करत आशना चौधरी हिने हे यश मिळवले. मेहनत आणि जिद्द या जोरावर तिने सर्व आव्हाने पार करून IPS स्वप्न साकार केले.6 / 10आशना चौधरी ही अशी आयपीएस अधिकारी आहे जी एखाद्या फिल्मी अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ती सोशल मीडियात खूप सक्रीय आहे. INSTA वर तिने ३ लाखाच्या आसपास फॉलोअर्स आहेत. ती उत्तर प्रदेशातील हापुड येथील असून तिचे वडील अजित चौधरी हे सरकारी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत.7 / 10वडिलांची सरकारी नोकरी आणि विशेष म्हणजे त्यांना नागरी सेवा करण्याची खूप आवड होती. त्यामुळेच आशना चौधरी हिने यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. गाजियाबाद येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून आशना चौधरीने शालेय शिक्षण पूर्ण केले. 8 / 10आशनाचे वडील अजित चौधरी सरकारी कॉलेजमध्ये प्रोफेसर तर आई इंदू गृहिणी आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या आशनानं आई वडिलांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यात यशही मिळवले.9 / 10२०१९ मध्ये पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर आशनानं यूपीएससीची तयारी केली. विना कोचिंग १ वर्ष पूर्ण केल्यानंतर २०२० साली परीक्षेचा पहिला प्रयत्न केला परंतु ती प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण करू शकली नाही. त्यानंतर २०२१ साली दुसऱ्यांदा तिने परीक्षा दिली. यावेळी अवघ्या अडीच मार्कांनी तिचं स्वप्न हुकलं. 10 / 10२ प्रयत्नात अपयश आल्यानंतर आशना निराश झाली, परंतु तिच्या घरच्यांनी खासकरून वडिलांनी तिला हिंमत दिली आणि ती पुन्हा जिद्दीने जुन्या चूका सुधारत नव्याने जोमात मेहनत घेऊ लागली. तिसऱ्या प्रयत्नात ती यशस्वी झाली.