शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमचे मूल तणावात आहे का? कोरोना काळात वाढती समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 13:54 IST

1 / 10
कोरोना काळात सगळे व्यवहार बंद. शाळा ऑनलाइन. बाहेर जाणे बंद. मित्रांशी संवाद साधायचा तोही मोबाइलवरूनच. बाहेर कुठे जायला बंदी. शॉपिंग नाही की ट्रिप नाही. त्यात कोरोनाच्या अभद्र बातम्या कानावर सातत्याने आदळणाऱ्या.
2 / 10
या सर्व गदारोळात लहानग्यांचे भावविश्व करपून गेले आहे. त्यांच्यात नैराश्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यातून त्यांना बाहेर काढणे गरजेचे आहे.
3 / 10
आई आणि वडील दोघेही घरूनच ऑफिसचे काम करत असल्याने मुले त्यांच्याकडून बरेच काही शिकत आहेत. आई-वडील घरी असल्याने मुलांमध्ये आपण सुरक्षित असल्याची भावना वाढीस लागली आहे.
4 / 10
कामाचा ताण काय असतो, हे मुलांना कळू लागले आहे. एका जागी बसून काम करणे शक्य असल्याचे मुलांना समजू लागले आहे. जबाबदारीचे भान मुलांमध्ये येऊ लागले आहे. एवढे सारे सकारात्मक परिणाम होऊ लागले आहेत.
5 / 10
पालकांनी मुलांना आपल्या आयुष्यात सामावून घ्यावे. घरातल्या छोट्या छोट्या निर्णयांमध्ये त्यांची मते आजमावून घ्यावीत.मुलांना सतत शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोत्साहित करा.
6 / 10
मुलांच्या ऑनलाइन ॲक्टिव्हिटींवर लक्ष ठेवा. त्यांना सातत्याने दुर्लक्षित करणे टाळा.मुलांचे मित्र कोण आहेत यावर लक्ष ठेवा. नैराश्याची लक्षणे दिसली तर तज्ज्ञांशी संपर्क साधा.
7 / 10
सततच्या लॉकडाऊनमुळे मुलांमध्ये एकलकोंडेपणा वाढू लागला आहे. मुले हट्टी होऊ लागले असून त्यांचा स्क्रीन टाइम वाढू लागला आहे.
8 / 10
सतत घरात राहिल्याने त्यांच्या शरीरावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अभ्यासाचा ताण वाढत आहे.मित्रांशी बोलणे खुंटल्याने नैराश्य वाढीस लागले आहे.
9 / 10
घरात कोंडून असलेल्या मुलांना सतत शांत राहण्याच्या सूचना करू नका. खेळताना मुलांनी आवाज करू नये, असे सातत्याने त्यांना सांगू नका.
10 / 10
खुशीमध्ये मुले ओरडली वा किंचाळली तरी त्यांना टोकू नका.मुलांच्या खुशीत स्वत:ही सहभागी व्हा.टीनएजर्सशी मैत्रीपूर्ण वागणूक ठेवा.त्यांना करिअरचा ताण येणार नाही, असे पाहा.त्यांच्यावर सातत्याने करिअर आणि अभ्यासासाठी दबाव आणू नका.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य