शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील प्रत्येक १० व्या व्यक्तीला कोरोनाची शक्यता; WHO च्या तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 2:06 PM

1 / 10
डब्ल्यूएचओने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगातील प्रत्येक 10 व्या व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते. डब्ल्यूएचओच्या या दाव्यावर विश्वास ठेवल्यास, सध्या जगातील कोरोना रुग्णांची संख्या पॉझिटिव्ह आढळलेल्या एकूण रुग्णांपेक्षा 20 पट जास्त असू शकते.
2 / 10
याशिवाय, भविष्यात कोरोनाची परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती डब्ल्यूएचओने व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन कार्यक्रमांचे प्रमुख डॉ. मायकेल रियान म्हणाले, 'ही आकडेवारी गावांपासून शहरापर्यंत वेगवेगळी असू शकते. वेगवेगळ्या वयोगटातील असू शकतात. परंतु याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, जगातील बहुसंख्य लोकसंख्या कोरोनाच्या धोक्यात आली आहे.'
3 / 10
कोरोना संक्रमणासंदर्भात आयोजित 34 सदस्यांच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत डॉ. मायकेल रियान म्हणाले, 'महामारीच्या रोगाचा प्रसार अजूनही सुरू आहे. मात्र, संक्रमण रोखण्याचे आणि जीव वाचविण्याचे मार्ग देखील उपलब्ध आहेत.'
4 / 10
डॉ. रियान म्हणाले की, 'दक्षिण-पूर्व आशियातील कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. युरोप आणि पश्चिमेकडील देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण खूप जास्त असल्याचे दिसून आले. तर आफ्रिका आणि वेस्टर्न पॅसिफिक देशांमध्ये परिस्थिती अधिक सकारात्मक होती.'
5 / 10
'आमच्या अंदाजानुसार, जगातील 10 टक्के लोक कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. म्हणजेच, जगातील सुमारे 760 कोटी लोकसंख्येपैकी 76 कोटी लोकांना कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते. डब्ल्यूएचओ आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठापेक्षा ही संख्या जास्त असू शकते,' असे डॉ. रियान यांनी सांगितले.
6 / 10
डब्ल्यूएचओ आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत जगातील केवळ 3.5 कोटी लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तज्ज्ञ आधीपासून सांगत आहेत की, कोरोना प्रकरणांची पुष्टी केलेली संख्या वास्तविक संख्येपेक्षा खूपच कमी असू शकते.जगातील बर्‍याच भागात कोरोना व्हायरस अजूनही प्रादुर्भाव वाढून शकतो, असे डॉ रियान यांनी म्हटले.
7 / 10
अधिकृत आकडेवारीनुसार, जगभरात कोरोनाची 3 कोटी 56 लाख प्रकरणे नोंदवली आहेत. यापैकी 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि भारतात सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अमेरिका आणि भारतात अनुक्रमे 76 लाख आणि 66 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
8 / 10
दरम्यान, भारतात कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. देशातील रुग्णांचा आकडा 66 लाखांवर गेला असून एक लाखहून अधिका लोकांचा मृत्यू झाला आहे.
9 / 10
मंगळवारी (4 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 61,267 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 884 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 66 लाख 49 हजारांवर पोहोचली.
10 / 10
आतापर्यंत 1 लाख 3 हजार 569 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 75 हजार 675 रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 56 लाख 62 हजार 491 लोक बरे झाले आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना