दात काढून टाकणे हा उपाय नव्हे!, उपचारांबाबत आजही गैरसमज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 13:21 IST
1 / 7सरकारी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील दंतरोग विभागात दररोज १०० हून अनेक जणांची ओपीडी असते. रुग्णांमध्ये अधिक प्रकारच्या तक्रारी या दातदुखी, हिरड्या फुगणे, दात हलणे यासंबंधित येतात. 2 / 7सर्व सरकारी रुग्णालयांतील दंतरोग विभागाच्या बाह्य रुग्ण उपचारांसाठी गर्दी असते. या रुग्णालयांमध्ये दर दिवशी शेकडो रुग्ण राज्यभरातून उपचारांसाठी येतात. 3 / 7जे. जे. समूह रुग्णालयाच्या सर्व रुग्णालयात दंतरोग विभागात दोन महिन्यांत ३० हजारांहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले आहेत. 4 / 7दात काढणे हे प्रत्येक दाताच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. काही वेळेला कीड हाताबाहेर गेल्यावर दात काढावे लागते. परंतु, प्रत्येक वेळी दात काढण्याचीच गरज नसते. अनेक जण मात्र दात काढा, असेच सांगतात. दात दुखतोय याचे कारण दातांना कीड लागून ती नसेपर्यंत गेली आहे किंवा दातांपासून हिरड्या वेगळ्या होतात.5 / 7दात हलणे हे हिरड्यांचे आजार असल्याचे कारणीभूत आहे. दातांची पकड सैल होते. तंबाखू खाण्याची सवय, क जीवनसत्त्वाचा अभाव यामुळे हिरड्या सुजतात. 6 / 7सरकारी रुग्णालयात खासगी सेवांच्या तुलनेत अत्यल्प शुल्क असते. अनेकदा खासगी रुग्णालयात या उपचारांकरिता हजारो, लाखो रुपयांत उपचार केले जातात.7 / 7दंत उपचारांसंदर्भात आजही समाजात अनेक गैरसमज आहेत. शिवाय, वेदनेविषयी एक वेगळी भीती. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. योग्यरीत्या भूल देऊन दातांचे सर्व उपचार वेदनारहित पद्धतीने होऊ शकतात. दातांमध्ये देण्याच्या इंजेक्शनची सुईही आता ‘मायक्रो नीडल’ प्रकारची वापरतात. हिरड्यांवर विशिष्ट प्रकारचे जेल किंवा स्प्रे वापरून सुई टोचण्याआधी हिरड्या बधिर करता येतात. त्यामुळे सुई टोचली तरी संवेदना जाणवत नाही. लेसरसारखी आधुनिक पद्धतीही आता रूढ झाल्या आहेत, अशी माहिती दंत शल्यचिकित्सक डॉ. साक्षी मल्होत्रा यांनी दिली आहे.