1 / 10कोरोना व्हायरसमुळे सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं होतं. परंतू आता लॉकडाऊनमुळे सगळीच काम ठप्प पडली आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी झाला नसला तरी लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. कोरोनासोबत जगताना इन्फेक्शनपासून लांब राहता यायला हवं. तरचं तुम्ही आणि तुमचं कुटुंब सुरक्षित राहू शकतं. 2 / 10 साधा ताप, सर्दी खोकला झाल्यास किंवा चेकअपसाठी तुम्ही तुमच्या परिसरातील दवाखान्यात किंवा एखाद्या मोठ्या रुग्णालयात जाण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी वेगवेगळी लोक येत असतात. त्यांना कोरोनाचं संक्रमण झालेलं असू शकतं. त्यांच्यासोबत तुम्हीसुद्धा संक्रमण घरी घेऊन येऊ शकता. असं होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.3 / 10दवाखान्यातून घरी आल्यानंतर त्वरित अंघोळ करा.4 / 10सतत दवाखान्यात जायला लागू नये म्हणून सगळे पेपर आणि आवश्यक वस्तू एकदाच सोबत घेऊन जा.5 / 10दवाखान्यातील वस्तूंना हात लावणं टाळा.6 / 10हाताच्या कोपराने दरवाजा उघडा.7 / 10अंघोळ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.8 / 10दवाखान्यात जाताना १८ वर्ष वयोगटातील व्यक्ती रुग्णासोबत असावी. जास्त वयस्कर व्यक्तींना रुग्णालयात एकटं पाठवू नका.9 / 10मास्क आणि हॅण्ड ग्लोव्हॅजचा वापर करा, दवाखान्यातून बाहेर आल्यानंतर शक्यतो तोंडाला स्पर्श करू नका.10 / 10जे कपडे घालून दवाखान्यात जाल ते कपडे घरी आल्यावर धुवायला टाका.