काही कळायच्या आत या गोष्टींमुळे तुम्हाला येऊ शकतो हार्ट अटॅक, वेळीच व्हा सावध...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 12:30 IST
1 / 10भारतात हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. हा धोका खासकरून तरूणांमध्ये वाढतो आहे. डॉक्टर्स प्रामुख्याने स्ट्रेस आणि डिप्रेशनने वेढलेल्या लाइफस्टाईलला याचं कारण मानतात. अशाच काही कॉमन सवयी आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही नकळत हृदयरोगांच्या जाळ्यात अडकत चालले आहात. जर यावर वेळीच लक्ष दिलं नाही तर तुमच्यासाठी महागात पडू शकतं.2 / 10टीव्ही बघणे - टीव्हीसमोर रोज ४ तासांपेक्षा अधिक बसून राहणाऱ्या लोकांमध्ये हार्ट आर्टरी डिजीज होण्याचा धोका ८० टक्क्यांनी अधिक असतो. एक्सपर्ट सांगतात की, भलेही तुमचं बॉडी वेट योग्य असेल, पण फार जास्त वेळ टीव्ही आणि कॉम्प्युटरसमोर बसून राहिल्याने ब्लड शुगर आणि फॅट्सवर वाईट प्रभाव पडतो. सामान्यपणे लोकांची सवय असते की, ८ ते ९ तास ऑफिसमध्ये काम करून घरी आल्यावर टीव्हीसमोर बसतात. हे हृदयाच्या आरोग्यासाठी घातक आहे. 3 / 10घोरण्याकडे दुर्लक्ष करणं - घोरण्याकडे भलेही तुम्ही झोपेत अडसर टाकणाऱ्या आवाजाच्या दृष्टीने बघत असाल, पण ही फार गंभीर समस्या आहे. ही समस्या ऑब्सट्रक्टिव स्लीप अॅपनियाचा संकेत असू शकते. या स्थितीत झोपेत श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि बीपी वाढू शकतो. अशा लोकांनी हृदयरोग होण्याचा धोका चार पटीने अधिक असतो. लठ्ठ लोकांमध्ये हा धोका अधिक बघायला मिळतो. त्यामुळे तुमच्या घोरण्याच्या सवयीबाबत वेळीच डॉक्टरांना संपर्क साधा.4 / 10जास्त मद्यसेवन करणे - वेगवेगळ्या रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, मद्याचं थोडं प्रमाण तुमच्या हृदयासाठी चांगलं ठरू शकतं. पण जास्त प्रमाणात मद्यसेवन कराल तर यांचा संबंध हाय ब्लड प्रेशरसोबत जोडला जातो. पुढे जाऊ याने हार्ट फेल होण्याचाही धोका असतो.5 / 10डेंटल प्रॉब्लेमवर लक्ष न देणे - हिरड्यांचं आरोग्य आणि हार्ट डिजीजचं खोलवर संबंध आहे. जर तुम्ही फ्लॉस वापरत नसाल तर बॅक्टेरिया आणि प्लाक जमा होत जाणार. याने हिरड्यांच्या वेगवेगळ्या समस्या होणार. पुढे जाऊन धमण्यांमध्ये प्लाक जमा होऊन हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.6 / 10जास्त खाणं - ओव्हरवेट असणं हे हृदयासाठी फार धोकादायक असतं. हृदयरोग टाळायचे असतील आणि सोबतच लठ्ठपणाचे शिकार व्हायचे नसेल तर जास्त खाऊ नका, जास्त अन्न ताटात घेऊ नका, गोड पेयांऐवजी पाण्याचं अधिक सेवन करा. फास्टफूडचं अधिक सेवन कराल तर हृदयरोगाचा धोका टाळता येऊ शकत नाही.7 / 10मिठाचं अधिक सेवन - जेवढं जास्त मिठाचं सेवन तुम्ही कराल, तेवढं जास्त ब्लड प्रेशर वाढणार. कमी मिठाने पदार्थ भलेही वेगळे लागत असतील पण कमी मीठ खाल तर तुमचं हृदय निरोगी राहू शकतं. उगाच जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात जीव गमावून बसाल.8 / 10फळं आणि भाज्या न खाणं - हृदयासाठी सर्वात चांगला आहार म्हणजे प्लांट बेस्ड डाएट असते. याचा अर्थ आहारात फळं, भाज्या, कडधान्य, लो फॅट डेअरी प्रॉडक्ट्स, प्रोटीनचा समावेश करावा. जंकफूडपासून दोन हात दूर रहा. एका रिसर्चनुसार जे लोक एका दिवसात ५ किंवा त्यापेक्षा जास्त फळं आणि भाज्या खातात, त्यांना हृदयरोगाचा धोका २० टक्के कमी राहतो.9 / 10स्मोकिंग करणं-स्मोकिंग करणाऱ्यांसोबत राहणं - स्मोकिंगच्या नुकसानांबाबत तुम्ही अनेकदा वाचलं असेलच. पुन्हा एकदा जाणून घ्या की, स्मोकिंग तुमच्या हृदयासाठी घातक आहे. स्मोकिंगमुळे ब्लड क्लॉट म्हणजेच रक्ताच्या गाठी तयार होता, ज्यामुळे हृदयाला होणारा रक्तप्रवाह रोखला जातो. हाय बीपी, कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, ओव्हरवेट होणे या समस्या स्मोकिंगमुळे होतात.10 / 10डिप्रेशनकडे दुर्लक्ष करणं - जर तुम्हाला नेहमीच उदास किंवा डिप्रेस वाटत असेल तर याचा प्रभाव तुमच्या हृदयावर पडतो. आज आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं. तुम्ही या इमोशन्सना कसं डील करता, हे तुमच्या हृदयाच्या आरोग्याला प्रभावित करतं. त्यामुळे डिप्रेशन किंवा चिंतेकडे दुर्लक्ष करू नका.