लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:36 IST
1 / 10लठ्ठपणावरील अलीकडच्या संशोधनात एक हैराण करणारा रिपोर्ट उघड झाला आहे. ज्याने लठ्ठपणा आणि हृदयरोग यांच्यातील संबंधांना आव्हान दिले आहे. सामान्यतः लठ्ठपणामुळे हृदयरोग आणि उच्च कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो असं मानले जाते. 2 / 10परंतु लठ्ठपणासाठी जबाबदार असलेले MC4R नावाचे जनुक हृदयरोगापासून देखील संरक्षण करते असं नुकत्याच संशोधनातून दिसून आले आहे. रिपोर्टनुसार, MC4R जनुकाचा दुर्मिळ प्रकार असलेल्या लोकांमध्ये LDL (खराब कोलेस्ट्रॉल) चे प्रमाण कमी असते आणि हृदयरोगाचा धोका कमी असतो. 3 / 10ही जनुक सुमारे एक टक्के लठ्ठ लोकांमध्ये आणि पाच टक्के लठ्ठ मुलांमध्ये आढळते. या संशोधनानुसार, यूकेमधील प्रत्येक ३०० लोकांपैकी एकामध्ये हे जनुक उत्परिवर्तन असू शकते असं शास्त्रज्ञ सांगतात. 4 / 10या संशोधनाचा उद्देश काही लोक लठ्ठ राहतात आणि तरीही हृदयरोगापासून कसे दूर राहतात हे समजून घेणे हा होता. केंब्रिज विद्यापीठातील मेटाबॉलिज्म तज्ञांनी हा अभ्यास केला. त्यात MC4R जनुक आपल्या मेंदूत एक असा प्रोटीन बनवतो, जे भूक नियंत्रित करते असं आढळून आले आहे. 5 / 10जेव्हा हे जनुक योग्यरित्या कार्य करते तेव्हा एखादी व्यक्ती कमी खातो. जेव्हा ते खराब होते तेव्हा एखाद्या व्यक्तीला जास्त भूक लागते आणि वजन लवकर वाढते. संशोधकांच्या मते, हे जनुक लठ्ठपणाला कारणीभूत ठरते परंतु दुर्मिळ प्रकार असलेल्या लोकांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असते ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.6 / 10या संशोधनात ७,७१९ मुले आणि १२४ प्रौढांच्या जनुकांची तपासणी करण्यात आली ज्यांच्या लठ्ठपणाचे कारण MC4R जनुकातील दोष होते. त्यानंतर त्यांची तुलना यूके बायोबँकमधील ३,३६,००० व्यक्तींशी करण्यात आली. 7 / 10यात MC4R ची कमतरता असलेल्या व्यक्तींमध्ये सामान्य लोकसंख्येपेक्षा रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल प्रोफाइल चांगले होते आणि हृदयाचे आरोग्य चांगले होते असं निकालांवरून असे दिसून आले. 8 / 10MC4R जनुक मेंदूद्वारे शरीरातील फॅट मेटाबॉलिज्म नियंत्रित करते. या जनुकातील बिघाड असलेल्या लोकांचे वजन वाढते, परंतु त्यांच्यात ट्रायग्लिसराइड्स आणि वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते असं या संशोधनाच्या निकालात आहे. 9 / 10एकूणच MC4R जनुकाचे कार्य समजून घेतल्यास हृदयरोग आणि उच्च कोलेस्ट्रॉलसाठी नवीन औषधे विकसित होऊ शकतात असं संशोधकांचे म्हणणे आहे. 10 / 10टीप - ही माहिती संशोधन अभ्यास आणि तज्ञांच्या मतावर आधारित आहे. त्यामुळे हा वैद्यकीय सल्ला नाही. कोणतीही नवीन उपाययोजना किंवा व्यायाम करण्यापूर्वी नेहमीच तुमच्या डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.