माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मोठा खुलासा : दक्षिण आफ्रिकेत नाही तर 'या' देशात आढळला 'ओमायक्रॉन' व्हेरिएंटचा पहिला रुग्ण, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 21:49 IST
1 / 10अॅमस्टरडॅम : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) ओमायक्रॉन (Omicron) या नवीन व्हेरिएंटबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेच्या आधी नेदरलँडमध्ये आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. 2 / 10दरम्यान, डच प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, नेदरलँडमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आधीच सापडला होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थच्या म्हणण्यानुसार, 19 आणि 23 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या दोन चाचणी नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळून आला होता. मात्र, हे लोक दक्षिण आफ्रिकेत (South Africa) गेले होते की नाही हे स्पष्ट झालेले नाही.3 / 10अधिकाऱ्यांनी सांगितले की, 26 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग आणि केपटाऊन येथून जवळपास 14 प्रवासी अॅमस्टरडॅमला पोहोचले होते. या लोकांनी आरोग्य प्राधिकरणाला याची माहिती दिली होती, त्यानंतर आता या प्रवाशांची चौकशी करण्यात येत आहे. 4 / 10त्याचवेळी, 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटचे पहिले प्रकरण नोंदवले गेले. याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आली होती. याआधी असे म्हटले जात होते की, नेदरलँडमध्ये 26 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून अॅमस्टरडॅमला पोहोचलेल्या 14 प्रवाशांना ओमायक्रॉन संसर्ग झाला होता. 5 / 10आरोग्य प्राधिकरणाने सांगितले की, येत्या काही दिवसांत नेदरलँडमधील ओमिक्रॉन प्रकारांच्या संसर्गाबाबत विविध अभ्यासांवर काम केले जाईल आणि यापूर्वी घेतलेल्या चाचणी नमुन्यांची पुन्हा तपासणी केली जाईल. 6 / 10युरोपियन देशांमध्ये, नेदरलँडमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन संसर्गाची 16 प्रकरणे आढळून आली आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंटची माहिती मिळाल्यानंतर जगातील सर्व देशांमध्ये कोविड नियमांची कडक अमंलबजावणी करण्यात आली आहे. 7 / 10जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटला अतिशय गंभीर असे म्हटले आहे, ज्यामध्ये 50 पेक्षा जास्त स्पाइक उत्परिवर्तन आहेत, ज्यामुळे गंभीर रोग होऊ शकतात आणि लस घेतलेल्या लोकांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो. 8 / 10प्राथमिक पुराव्यानुसार, ज्यांना आधी कोरोनाचा संसर्ग झाला आहे, अशा लोकांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा कोरोना होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लोकांना सहज संसर्ग होऊ शकतो.9 / 10दक्षिण आफ्रिकेत या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे वृत्त प्रथम आढळल्यानंतर अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेसह इतर आफ्रिकन देशांवर प्रवास बंदी लादली आहे. याआधी जगाने कोरोना डेल्टा व्हेरिएंटने घातलेला धुमाकूळ पाहिला आहे. 10 / 10याचबरोबर, कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटबाबत जगभरात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनावर आधीच अस्तित्वात असलेली प्रतिबंधक लस नवीन व्हेरिएंटवर काम करेल का? किंवा यासाठी नवीन लस बनवण्याची गरज आहे का, यावर सध्या चर्चा सुरु आहे.