Omicron Infected Children: भीती वाढू लागली! लहान मुलांची नैसर्गिक देणगी भेदतोय ओमायक्रॉन; लसही फेल होण्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 19:36 IST
1 / 8भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला आता दोन वर्षे होणार आहेत. 31 जानेवारी 2020 मध्ये पहिला रुग्ण सापडला होता. या काळात दोन लॉकडाऊन लागले, दुकाने, मॉल बंद झाले; पुन्हा नव्याने सुरु झाले. आज तुम्ही दोन वर्षांपूर्वीचे एखादे दुकान किंवा हॉटेल शोधण्यासाठी गेलात तर ते तुम्हाला तिथे ते दिसणार नाही, एकतर ते बंद झाले असेल किंवा लहान जागेत हलविण्यात आले असेल. सारे काही बदलले पण एक बदलले नाही, ते म्हणजे कोरोनाची दहशत.2 / 8दक्षिण आफ्रिकेच्या नव्या व्हेरिअंटने जगाची भीती वाढविली आहे. आज हा शास्त्रज्ञ काहीतरी भाकित करतो, उद्या खुद्द डब्ल्युएचओच तो किती खरतनाक आहे हे सांगते. ओमायक्रॉन जीवघेणा वाटत नसल्याचे दिसत असताना एका रुग्णाचा मृत्यू पुन्हा शास्त्रज्ञांना बुचकळ्यात टाकतो. भारतातही आतापर्यंत 65 रुग्ण सापडले आहेत. हे सारे तरुण किंवा वयस्कर होते. परंतू आज पश्चिम बंगालमध्ये एक सात वर्षांचा मुलगा ओमायक्रॉन बाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. 3 / 8तत्पूर्वी दीड वर्षांची मुलगी बाधित झाली होती. यामुळे कोरोना लसीपासून दूर राहिलेल्या मुलांना नव्या व्हेरिअंटचा धोका किती आहे, याची चर्चा होऊ लागली आहे. 4 / 8कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागताच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका होण्याची शक्यता वारंवार व्यक्त केली आहे. तिसरी लाट येण्याआधी मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे. परंतू मुले अद्याप लसीमुळे सुरक्षित झालेली नाहीत. अशावेळी त्यांना नैसर्गिक सुरक्षा कवचावरच अवलंबून रहावे लागणार आहे. कारण सीरमच्या अदार पूनावाला यांनी मुलांसाठी लस येण्यास अद्याप सहा महिने लागू शकतात असे म्हटले आहे. 5 / 8कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही के पॉल यांनी देखील ओमायक्रॉनविरोधात लस फेल जाऊ शकते, असे म्हटले आहे. यामुळे ओमायक्रॉन पुढील काळात देशवासियांची चिंता वाढवू शकतो. कारण अनेकांचे मत तसेच आहे. 6 / 8बंगालमध्ये ओमायक्रानचा पहिला रुग्ण सापडला आहे. मुर्शिदाबादमध्ये सात वर्षांचा मुलगा, जो 10 डिसेंबरला अबुधाबी येथून हैदराबादला आला होता, तो बाधित आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात सर्वाधिक दिसले आहेत. 7 / 8ओमायक्रॉनवर कोरोनाच्या लसी किती परिणाम करतात यावर कॅलिफोर्निया विद्यापीठाने नवीन अभ्यास केला आहे. विद्यापीठातील तज्ज्ञ बिली गार्डनर आणि मार्म किलपॅट्रिक यांनी एक मॉडेल विकसित केले आहे. यामध्ये ओमायक्रॉनमुळे संरक्षण कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्यातरी लसीमुळे गंभीर संक्रमण होत नाहीय. 8 / 8या रिपोर्टनुसर Pfizer/BioNTech आणि मॉडर्नाच्या लसी दोन डोस घेतले तरी ओमायक्रॉनविरोधात 30 टक्केच प्रभाव दाखवत आहेत. डेल्टा व्हेरिअंटविरोधात या लसी 87 टक्के प्रभावी होत्या. बुस्टर डोस दिल्यावर 30 वरून 48 टक्के एवढे संरक्षण मिळेल.