1 / 10देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. मात्र ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त असल्यानं आरोग्य यंत्रणेवर खूप मोठा ताण आहे.2 / 10राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांत कमी झाला आहे. जवळपास महिनाभरापासून राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. मात्र एका वेगळ्याच संकटानं प्रशासनाची चिंता वाढली आहे.3 / 10महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशात ब्लॅक फंगसचा धोका वाढला आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना ब्लॅक फंगसचा सामना करावा लागत आहे. मध्य प्रदेशात ब्लॅक फंगसची बाधा झालेल्यांची संख्या वाढू लागली आहे.4 / 10ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या वाढल्यानं त्यासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. भोपाळमध्ये एकाच दिवसात ब्लॅक फंगसचे ७ रुग्ण आढळून आले. या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. उपचारांनंतर त्यांना ब्लॅक फंगसची लागण झाली.5 / 10सोमवारी हमीदिया रुग्णालयात ब्लॅक फंगसचे सहा रुग्ण दाखल झाले. ब्लॅक फंगसची बाधा झालेल्या काही जणांच्या अवयवांना मोठा फटका बसला आहे. भोपाळ एम्समध्ये दाखल झालेल्या एका ५४ वर्षीय व्यक्तीचे ९ दात आणि जबड्याचा एक भाग काढावा लागला.6 / 10ब्लॅक फंगसची लागण झालेला एक रुग्ण भोपाळमधील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचा एक डोळा काढण्यात आला. याशिवाय इतर रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांवरदेखील शस्त्रक्रिया होणार आहेत.7 / 10गेल्या काही दिवसांत फंगल इंफेक्शनचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे आता बाजारात औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. फंगल इंफेक्शन झालेल्या रुग्णांना को एम्फोटिसिरीन-बी ५० एमपी इंजेक्शन दिलं जातं. सध्या या इंजेक्शनसाठी बरीच धावाधाव करावी लागत आहे.8 / 10खंडवा येथे वास्तव्यास असणारी एक ६५ वर्षीय महिला हमीदिया रुग्णालयात दाखल झाली होती. तिला मधुमेहाचा त्रास आहे. दोन आठवड्यांपूर्वी तिला फंगल इंफेक्शन झालं. सोमवारी तिचा एक डोळा काढावा लागला.9 / 10इंदूरमध्येदेखील अशाच प्रकारच्या दोन घटना घडल्या. दोन रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचा डोळा काढण्यात आला. या रुग्णांना मधुमेहाचादेखील त्रास नव्हता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.10 / 10मध्य प्रदेशासोबतच महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडमध्येही ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. हा आजाराचा सामना करण्यासाठी राज्य सरकारांनी तयारी सुरू केली आहे.