By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 08:59 IST
1 / 10संपूर्ण जगात जेव्हा कोविडच्या डेल्टा व्हेरिएंटचं संक्रमण पसरण्याच सुरुवात झाली तेव्हा वैज्ञानिकांनी बूस्टर डोस चाचणी सुरु केली. अनेक देशांनी मिक्स एँड मॅच व्हॅक्सिन बूस्टर डोसची तपासणी केली. याचा हैराण करणारा रिपोर्ट समोर आला आहे. 2 / 10आतापर्यंत जवळपास ६ ते ७ स्टडी रिपोर्ट प्रकाशित झाली आहेत. ज्याठिकाणी एकाच लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर बूस्टर डोसही त्याच लसीचा घेणाऱ्यांमध्ये ४ ते १२ टक्क्यांनी अँन्टिबॉडी वाढली आहे. असं या स्टडी रिपोर्टमधून दिसून येते. 3 / 10परंतु ज्या लोकांनी बूस्टर डोस दोन्ही डोसच्या लसीहून वेगळा घेतला आहे. त्यांच्यात २८ ते ३२ टक्क्यांनी अँन्टिबॉडी वाढल्याचे आढळले. म्हणजे मिक्स मॅच बूस्टर डोस तुलनेने एक तृतीयांश इम्युनिटी आणखी वाढण्याचे पुरावे या स्टडी रिपोर्टमध्ये सापडले आहेत.4 / 10एकीकडे डेल्टा व्हेरिएंटच्या भीतीने जगातील अनेक देशांनी बूस्टर डोसची चाचणी केली आणि लोकांना तिसरा डोस देण्यास सुरुवात केली. तर भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या एन्ट्रीनंतर बूस्टर डोस देण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टासारखा धोकादायक नाही. परंतु डेल्टाच्या तुलनेने तो अधिक वेगाने संक्रमित करत आहे.5 / 10ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता भारतातही बूस्टर डोस चाचणीवर चर्चा सुरु आहे. याचवेळी यूकेच्या स्टडी रिपोर्टनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यात मिक्स अँन्ड मॅच व्हॅक्सिनच्या बूस्टर डोसमुळे जास्त अँन्टिबॉडी शरीरात आढळली आहे.6 / 10द लेसेंटमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टवर तज्ज्ञ डॉ. अंशुमान कुमार म्हणाले की, यावर ६ ते ९ स्टडी झाल्या आहेत. परंतु या रिपोर्टमध्ये मिक्स अँन्ड मॅच बूस्टर डोस जास्त परिणामकारक असल्याचं आढळलं आहे. स्टडीत २८७८ लोकांचा समावेश होता.7 / 10व्हायरसचे अनेक कंपोनेंट असतात आणि व्हॅक्सिन बनवण्याची पद्धती वेगवेगळी असते. व्हॅक्सिन एकप्रकारे एंटिजनचं मिश्रण असतं. जे व्हायरसविरोधात अँन्टिबॉडी बनवतं. जेव्हा म्युटेशन असतं तेव्हा व्हायरसच्या स्वरुपात बदल होतो. काही विशिष्ट बदल झाल्यास व्हॅक्सिनचा प्रभाव कमी होण्याची भीती असते.8 / 10जर कुठली आरएनए व्हॅक्सिन आहे आणि म्युटेशन झालं असेल तर ज्या लोकांनी ही व्हॅक्सिन घेतली आहे. त्यांना दुसऱ्या पद्धतीने बनवण्यात आलेली लस दिली तर ती खूप प्रभावी ठरते. जर मिक्स अँन्ड मॅच केले गेले तर नवीन लसीचा परिणाम दिसेल आणि म्युटेशननंतरही लस प्रभावी ठरेल.9 / 10जर व्हायरस त्याच्या रुपात बदल करुन चकमा देण्याचा प्रयत्न करत असेल तर लसीमध्येही त्यानुसार बदल करुन चकमा दिला जाऊ शकतो. त्यासाठी मिक्स अँन्ड मॅच बूस्टर डोस गरजेचा आहे. म्हणजे जर कुणी सुरुवातीचे दोन्ही डोस कोविशील्डचे घेतले असतील तर त्याला बूस्टर डोस कोव्हॅक्सिनचा दिला जावा असं डॉ. अंशुमान यांनी सांगितले. 10 / 10पहिला डोस घेतल्यानंतर ३ आठवड्यापर्यंत अँन्टिबॉडी बनते त्यानंतर त्यात घट होते त्यामुळे चौथ्या आठवड्यात दुसरा डोस दिला जातो. कोरोना व्हॅक्सिनच्या अनेक स्टडीत ३ महिन्यांनी अँन्टिबॉडीचा स्तर कमी होत असल्याचं दिसून आले. त्यामुळे बूस्टर डोस आवश्यक असल्याचं अनेक तज्ज्ञांचे म्हणणं आहे.