२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे. संंपूर्ण जगात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने आज आम्ही आपणास अशा काही अभिनेत्रींच्या बाबतीत माहिती देत आहोत ज्यांच्या आयुष्यात योगाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. जणू योगा त्यांच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भागच आहे. चला जाणून घेऊया त्या अभिनेत्रींविषयी...! * करिना कपूरने प्रेगन्सीनंतर योगाच्या माध्यमानेच वाढलेले वजन कमी केले. ती नियमित पती सैफ अली खान आणि योगा टिचर पायलसोबत योगा करीत असते. * कंगना राणावतसाठी योगा तिच्या फिटनेसचा मंत्राच आहे. कंगणा नियमित योगा करीत असते. ती योगा केल्याशिवाय एक दिवस राहू शकत नाही. * आपल्या फिटनेसच्या बाबतीत नेहमी जागृत राहणारी मलायका अरोडा खानदेखील नियमित योगा करते. फिटनेससाठी ती वेळात वेळ काढून नियमित योगा करतेच. * नरगिस फाखरीदेखील नियमित योगा करते. त्यामुळे ती स्लिम व फिट राहते. शिवाय दिवसभर फे्रशही असते. * शर्लिन चोपडादेखील नियमित योगा करीत असते. शर्लिनला विशेष हॉट योगा करणे पसंत आहे. * बिपाशा बसुच्या फिटनेसचे खरे गुपित म्हणजे योगाच आहे. बॉलिवूडमध्ये सर्वात फिट अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे ती योगामुळेच. करन सिंह ग्रोवरदेखील तिच्या बरोबर योगा करणे टाळत नाही. * दिवसभराचा ताणतणाव दूर करण्यासाठी शिल्पा शेट्टी योगाचा आधार घेते. योगा करण्याचे तिचे बरेच व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअरही केले आहेत. * रानी मुखर्जीही फिट राहण्यासाठी नियमित योगा करते. Also Read : Video : पोटाची चरबी करण्यासाठी शिल्पा शेट्टीने सांगितले खास योगासने ! : योगगुरू बाबा रामदेव यांच्यावरील बायोपिकची अजय देवगण करणार निर्मिती!