शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोना लसीचा तिसरा डोस घ्यायचा कसा, कुठे जायचं आणि खर्च किती?...जाणून घ्या सोप्या शब्दांत...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 9:21 AM

1 / 7
वय वर्ष १८ पेक्षा अधिक असलेल्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा म्हणजेच प्रिकॉशनरी डोस घ्यावा लागणार आहे. १० एप्रिलपासून देशभरातील लसीकरण केंद्रांवर हा तिसरा डोस उपलब्ध असेल. आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठीच डोस होता.
2 / 7
१८ वर्षे वयावरील सर्वांना हा डोस दिला जाईल. ज्यांना लसीचे दोन्ही डोस घेऊन नऊ महिने झाले आहेत. त्यांनाच प्राधान्याने हा डोस दिला जाईल. त्यामुळे ज्यांना लसीचे दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत त्यांनीच हा तिसरा डोस घ्यावा.
3 / 7
कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक
4 / 7
सरकारी आदेशानुसार १८ वर्षावरील सगळ्यांना खासगी लसीकरण केंद्रांत तिसरा डोस मिळेल. ६० वर्षे वयावरील ज्येष्ठांना तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनाच सरकारी लसीकरण केंद्रावर तिसरा डोस मिळू शकणार आहे. सरकारी केंद्रांवर दिल्या जाणाऱ्या लसीच्या पहिल्या दोन मात्रांची सुविधा सुरूच राहील.
5 / 7
कोविशिल्डच्या तिसऱ्या डोससाठी २२५ रुपये खर्च येईल. २२५ रुपये कोव्हॅक्सिन आणि ११४५ रुपये स्पुतनिक लसीचा खर्च येईल.
6 / 7
हा डोस घेणे सक्तीचे नसले तरी खबरदारी म्हणून घ्यायला हवा, असे तज्ज्ञांचे मत आहे. कोरोना विषाणू सातत्याने आपले रुप बदलत असल्याने तिसरा डोस घ्यावा असा आग्रह आहे.
7 / 7
या डोसमुळे रोगप्रतिकारक शक्ती अधिक वृद्धिंगत होईल. हा डोस घेण्यासाठी नव्याने नोंदणीचीही गरज नाही. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरुन कोविन पोर्टलवर जाऊन अपॉइंटमेंट घेता येईल.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या