-Ravindra Moreउन्हाळ्यात बहुतांश लोकांना घाम येतोच, मात्र यामुळे येणाऱ्या दुर्गंधीमुळे आपणास लाजिरवाणे व्हावे लागते. या समस्येने बरेच लोक त्रस्त असतात आणि यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डियोड्रेंटदेखील वापरतात ज्याचा परिणाम फक्त तात्पुरता असतो. जर आपणही घामाच्या वासाने त्रस्त असाल तर घरगुती टिप्सच्या साह्याने ही समस्या दूर करू शकता. * व्हिनेगर घामाच्या वासापासून मुक्ततेसाठी व्हिनेगरचा वापर करू शकता. बगलमध्ये व्हिनेगर लावल्याने घामाचा वास येत नाही आणि आपणास पुन्हा-पुन्हा डियोड्रेंट लावण्याची गरज पडणार नाही. * कडुलिंबकडुलिंबाने घामाच्या वासापासून सुटका मिळण्याबरोबरच बॅक्टेरियादेखील नष्ट होतात. यासाठी कडुलिंब पाण्यात टाकुन पाणी गरम करा आणि त्या पाण्याने अंघोळ करा, यामुळे घामाचा वास येणे थांबते. * बेकिंग सोडाघामाची दुर्गंधी करण्यासाठी बेकिंग सोडा एक चांगला पर्याय आहे. यासाठी एक चमच बेकिंग सोडाला लिंबूच्या रसात मिसळा आणि अंडर-आर्म्समध्ये लावा, याचा नक्कीच चांगला परिणाम होईल. * पुदीनापुदीनाच्या पानांना पाण्यात टाकून ते पाणी गरम करा. हे पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळा, याने अंघोळ केल्याने आपणास फे्रश वाटेल आणि घामाच्या वासापासूनही सुटका मिळेल. * गुलाब पाणीअंघोळीच्या पाण्यात गुलाब पाणी मिसळल्याने घामाच्या वासापासून सुटका मिळते. * बेसनजर घामाचा वास जास्तच येत असेल तर बेसनमध्ये दही मिक्स करून शरीरावर लावा आणि थंड पाण्याने अंघोळ करा, यामुळे नक्कीच फायदा होईल.