शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...तर तुमचं आमचं आयुष्य वाढणार; जीन थेरेपी माणसांसाठी वरदान ठरणार?

By कुणाल गवाणकर | Published: January 21, 2021 6:59 PM

1 / 10
वृद्धापकाळ कोणालाच आवडत नाही. आपण जास्तीत जास्त तरुण दिसावं, जास्त काळ तरुण रहावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळेच तर सगळेच जण आपण तरुण दिसावं यासाठी प्रयत्न करत असतात.
2 / 10
माणसाचं आयुष्य वाढावं यासाठीची एक उपचार पद्धत चिनी शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. चिनी शास्त्रज्ञांनी उंदरांवर ही पद्धत वापरून पाहिली. त्यामुळे उंदरांचं आयुष्य २५ टक्क्यांनी वाढलं.
3 / 10
माणसाचं आयुष्य वाढवण्यासाठी चिनी शास्त्रज्ञ जीन थेरेपीवर काम करत आहेत. माणसांचं आयुष्य वाढवणं, ते जास्त दिवस तरुण राहावेत, वृद्धापकाळाशी संबंधित आजार होऊ नयेत असे उद्देश ठेवून चिनी शास्त्रज्ञांचं संधोशन सुरू आहे.
4 / 10
सायन्स ट्रान्सलेशन मेडिसिन जर्नलमध्ये जीन थेरेपीची माहिती प्रसिद्ध झाल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे. जीन थेरेपीच्या माध्यमातून kat7 नावाच्या जनुकांना निष्क्रिय करण्यात येतं. पेशींना वृद्ध करण्याचं काम kat7 करतात.
5 / 10
चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेसच्या (Chinese Academy of Sciences - CAS) इन्स्टिट्यूट ऑफ झुलॉजीचे प्राध्यापक कू जिंग आणि त्यांच्या टीमनं जीन थेरेपीचा शोध लावला आहे.
6 / 10
जीन थेरेपीचा वापर उंदरांवर करण्यात आला. ६ ते ८ महिन्यांनंतर त्यांच्यामध्ये बदल दिसून आले. त्यांची पकड मजबूत झाली. त्यांचं आयुष्य २५ टक्क्यांनी वाढलं, अशी माहिती कू जिंग यांनी दिली.
7 / 10
वयाशी संबंधित काम करणारी १०० जनुकं आम्ही शोधली आहेत. यातल्या kat7 मुळे माणसं लवकर वृद्ध होतात. त्यांच्यामुळेच माणसाचा मृत्यू होतो, असं जिंग यांनी सांगितलं.
8 / 10
जिंग आणि त्यांच्या टीमनं kat7 ला निष्क्रिय केलं. या पद्धतीला लेंटिवायरल वेक्टर असं म्हटलं जातं.
9 / 10
उंदरांच्या शरीरातील विविध पेशांमध्ये जिंग आणि त्यांच्या टीमला kat जनुकं दिसली. त्यामुळे उंदिर लवकर वृद्ध होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
10 / 10
माणसाच्या शरीरावर हा प्रयोग करण्यासाठी विविध परवानग्यांची गरज आहे. त्याआधी ही चाचणी अधिक सुरक्षित करण्याची आवश्यकता आहे. यानंतरच मानवी शरीरावर या प्रकारचा प्रयोग करता येईल.