1 / 8ब्रिटेनमध्ये नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमध्ये कोरोना लसीसंदर्भात मोठा दावा करण्यात आला आहे. देशभरात केलेल्या एका स्टडीनुसार, फायझर (Pfizer) किंवा मॉडर्ना कोरोना लसीचा (Moderna vaccine) चौथा डोस सुरक्षित आहे आणि तिसऱ्या डोसच्या तुलनेत अँटीबॉडीजची पातळी अनेक पटीने वाढते. 2 / 8ब्रिटनमध्ये कोरोना लसीचा चौथा डोस 'स्प्रिंग बूस्टर' म्हणून कोरोनाच्या अतिसंवेदनशील लोकांना दिला जात आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. स्टडीची आकडेवारी उपलब्ध होण्याआधी अँटीबॉडीजची उच्च पातळी राखून ठेवण्यासाठी ही एक सावधगिरीची रणनीती असल्याचेही संशोधकांनी सांगितले. 3 / 8'द लॅन्सेट इंफेक्शियस डिजीज जर्नल'मध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा चौथा डोस अशा लोकांना फायदेशीर असल्याचे दिसून येत आहे की, ज्यांनी फायझर लसीचा तिसरा डोस घेतला आहे. संशोधनांच्या मते, हे अँटीबॉडीज आणि शेल बॉडीज यांना बूस्टर डोसच्या अपेक्षित कमाल पातळीच्या पलीकडे घेतले जातात.4 / 8हे परिणाम सध्याच्या स्प्रिंग डोस घेणाऱ्या अत्यंत संवेदनशील व्यक्तींना फायदे सूचित करतात आणि ब्रिटनमध्ये कोणत्याही संभाव्य लसीकरणासाठी आत्मविश्वास प्रदान करतात, असे एनआयएचआर साउथॅम्पटन क्लिनिकल रिसर्च फॅसिलिटेचे संचालक आणि परिक्षण प्रमुख प्रोफेसर साउल फाउस्ट यांनी सांगितले आहे. 5 / 8स्टडीमध्ये जून २०२१ मध्ये फायझर किंवा अॅस्ट्राजेनेकाची सुरूवातीचा डोस घेतल्यानंतर १६६ अशा लोकांची निवड करण्यात आली, ज्यामध्ये तिसरा डोस म्हणून फायझर लस दिली होती. 6 / 8या लोकांना कोणत्याही निर्धारित क्रमाशिवाय चौथा डोस म्हणून फायझरचा पूर्ण डोस किंवा मॉडर्नाचा अर्धा डोस घेण्यासाठी निवडण्यात आले होते. या लोकांना तिसऱ्या डोसनंतर सुमारे सात महिन्यांनी चौथा डोस देण्यात आला.7 / 8लसीकरण सेंटरवर अंगदुखी आणि थकवा ही सामान्य लक्षणे होती. मात्र लसीसंबंधीत कोणतेही गंभीर साइडइफेक्ट्स दिसून आले नाहीत. या लोकांना चौथा डोस सुरक्षित वाटला, असे संशोधकांनी सांगितले. 8 / 8तर आम्हाला माहिती होते की वर्षाच्या सुरुवातीला सर्वात संवेदनशील लोकांना चौथा डोस देणे गरजेचे होते, असे कोरोना लसीकरण कार्यक्रमाच्या एनआयएचआरचे क्लिनिकल प्रमुख प्रोफेसर अँड्र्यू उस्तीयानोव्स्की यांनी सांगितले.