CoronaVaccination: डॉक्टरांचा इशारा! कोरोना लस घेण्याआधी या 5 गोष्टी करू नका, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 16:13 IST
1 / 10जगभरासह देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. देशात कोरोना लसीचा साठा मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. अशातच अनेकजण कोरोना लसीकरणासाठी कधी नंबर लागेल याची वाट पाहत आहेत. (Avoid this thing before corona Vaccination.)2 / 10जर तुम्हाला कोरोना लसीकरण करायचे असेल तर त्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांनीच अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या लस टोचून घेण्याआधी 24 तास करायच्या नाहीत. 3 / 10डोकेदुखी, पाठदुखीसह अन्य काही कारणासाठी जर तुम्ही पेन किलर घेत असाल तर कोरोना लसीकरणाआधी 24 तास अशी गोळी घेऊ नये. वेदना शमविण्यासाठी अन्य कोणतेही औषध असेल तर ते घेऊ नये. लस टोचल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने पेन किलर घ्यावी. 4 / 10कोरोना लस टोचण्याआधी दारुचे सेवन अजिबात करू नये. दारुमुळे डीहायड्रेशन आणि हँगओव्हर होऊ शकतो. जे कोरोना लसीला बेकार करू शकते. लस घेण्य़ाआधी खूप पाणी पिण्याचा सल्ला देतात. 5 / 10लसीकरणाच्या आदल्या रात्री जागरण करू नये. चांगली झोप झाल्यास शरीर लसीला चांगला रिस्पॉन्स देते. 6 / 10कोरोना लसीच्या दिवशी किंवा आधी काही दिवस अन्य कोणतीही लस टोचून घेऊ नये. एखादे इंजेक्शन घेतल्यास त्याच्या 14 दिवसांनंतरच कोरोना लस घ्यावी. 7 / 10कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नये. कोणतीही लस इम्युनिटी वाढविण्यासाठी वेळ घेते. मास्क जरुर घालावा. कोरोना लस घेतली किंवा घेणार म्हणून मास्क नाही घातला तरी चालेल हे चुकीचे आहे. 8 / 10लस टोचल्यानंतर लगेचच हॉस्पिटलच्या बाहेर जाण्याची गडबड करू नये. कमीतकमी 15 मिनिटे तिथेच थांबावे. काही जाणवल्यास लगेचच डॉक्टरांना कळवावे.9 / 10लस घेतल्यानंतर तुमच्या हातांना वेदना होऊ शकतात. म्हणून लस घेतल्यानंतर काही दिवस वर्कआऊट करणं टाळा. अति व्यायाम केल्यानं तुमच्या हातांच्या वेदना जास्त वाढू शकतात. 10 / 10लस घेतल्यानंतर लगेचच कामाला सुरूवात करू नका. २ ते ३ दिवस आराम करा. लस घेतल्यानंतर २४ तासांनी साईड इफेक्ट्स दिसायला सुरूवात होते. म्हणून लस घेतल्यानंतर कमीतकमी दोन ते तीन दिवस आपल्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष द्या.