शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! वॅक्सीनलाही मात देत आहे कोरोनाचा नवा स्ट्रेन, वैज्ञानिकांनी या गोष्टीचा दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 17:12 IST

1 / 9
कोरोना व्हायरसचा C.37 स्ट्रेन ज्याला लॅम्बा व्हेरिएंट (Covid-19 Lambda Variant) असंही नाव आहे. हा व्हेरिएंट आता वेगाने पसरत आहे आणि पेरूमध्ये साधारण ८० टक्के संक्रमणाच्या केसेस याच स्ट्रेनच्या आहेत. कोरोनाचा हा व्हेरिएंट गेल्या एक महिन्यात २७ पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे.
2 / 9
वैज्ञानिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली की, असं असू शकतं की, कोविड-१९ चा हा स्ट्रेन वॅक्सीनेशन प्रति इम्यून असेल आणि यावर वॅक्सीनचा काहीच प्रभाव होणार नाही. कोरोनाच्या या स्ट्रेनने पेरूमध्ये थैमान घातलं आहे आणि वेगाने याच्या केसेस समोर येत आहेत.
3 / 9
C.37 स्ट्रेन ज्याला लॅम्बा व्हेरिएंट नाव देण्यात आलं आहे. याची सर्वात पहिली केस डिेसेंबर २०२० मध्ये पेरूमध्ये समोर आली होती. तेव्हा कोरोनाच्या एकूण केसेसमध्ये या व्हेरिएंटने संक्रमित केसेसची संख्या साधारण १ टक्के होती.
4 / 9
फायनॅन्शिअल टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, आता पेरूमध्ये ८० टक्के नव्या केसेस याच व्हेरिएंटच्या आहेत आणि हा २७ पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे.
5 / 9
सॅंटियागोच्या यूनिव्हर्सिटी आणि चिलीने लॅम्ब्डा स्ट्रेनचा प्रभाव अशा वर्कर्सवर पाहिला, ज्यांना चीनची कोरोना वॅक्सीन कोरोनावॅकचे दोन डोज दिले गेले होते.
6 / 9
या रिसर्चनुसार, लॅम्बा व्हेरिएंट गामा आणि अल्फापेक्षा जास्त संक्रामक आहे. या व्हेरिएंटवर वॅक्सीन घेतल्यावर तयार झालेल्या अॅंटीबॉडीजचा काहीच प्रभाव होत नाही.
7 / 9
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, या स्ट्रेनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल झाले आहेत. ज्यामुळे हा व्हेरिएंट जास्त संक्रामक झाला आहे. आणि अॅंटीबॉडीजचाही यावर काहीच प्रभाव पडत नाहीये.
8 / 9
ह्यूमन सेल्सना संक्रमित करणारा लॅम्ब्डा व्हेरिएंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये सात म्यूटेशनचा एक खास पॅटर्न असतो.
9 / 9
वैज्ञानिक म्हणाले की, या व्हेरिएंटमुळे कोरोना संक्रमित रूग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढली आहे. तज्ज्ञांनी लोकांना सावध राहण्याचा आणि गाइडलाईन फॉलो करण्याचा इशारा दिला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयCorona vaccineकोरोनाची लसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना