1 / 11कोरोनाच्या बहुतांश रुग्णांमध्ये आजाराची खूप सौम्य लक्षणे दिसतात. मात्र वयस्कर, मधुमेह, कर्करोग आणि किडनीसंबंधीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून येतात. कोविड-१९मुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये ८० टक्के रुग्ण हे ६५ वर्षांवरील असल्याचा अंदाज आहे. 2 / 11कोरोना विषाणू माणसांच्या फुप्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे त्याच्या छातीमध्ये वेदना आणि जळजळ होते. सेंटर्स फॉर डिसीड कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी)च्या म्हणण्यानुसार यामुळे छातीमध्ये सातत्याने वेदना आणि दाब येत असल्याचे वाटत राहते. अशा परिस्थितीत रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासते. 3 / 11डॉक्टर्स सांगतात की, छातीमधील वेदना किंवा जळजळ कोविड-१९ च्या संसर्गाचे संकेत असू शकतात. छातीमध्ये जळजळीसह जर कुणाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर असे कोरोनामुळे होऊ शकते. एका अध्ययनानुसार कोविड-१९च्या १७.७ टक्के रुग्णांनी छातीत वेदनेची तक्रार केली आहे. कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणांसह श्वास घेण्यास त्रास वा छातीत वेदनेची तक्रार दिसून येऊ शकते. एका अध्ययनानुसार कोरोनामधून वाचणाऱ्यांपेक्षा कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या छातीमध्ये तीन पट अधिक वेदना होतात. 4 / 11फुप्फुसाच्या आसपास असणाऱ्या टिश्शूमध्ये इन्फ्लेमेशन किंवा हार्ट इंजरीमुळे छातीत वेदना होऊ शकतात. कोरोना विषाणू एंजियोटेंसिन कन्वर्टिंग एंजाइम २ (एसीई२) नावाच्या रिसेप्टरच्या माध्यमातून आतील पेशींमध्ये प्रवेश करू शकतो. एसीई२ शरीराच्या अनेक भागांत दिसून येतो. ज्यामध्ये फुप्फुसे, हृदय आमि गॅस्ट्रोइंटसटाइनल ट्रॅक्टचा समावेश आहे. एकदा जेव्हा विषाणू एसीई२ च्या माध्यमातून पेशींमध्ये प्रवेश करतो त्यानंतर तो सेल्युलर डॅमेज आणि इन्फ्लेमेशनचे कारण ठरू शकतो. 5 / 11इम्युन सिस्टिममधून रिलीज होणारे अणू ज्यांना इन्फ्लेमेटरी सायकोटानइन स्टॉर्म सिंड्रोम म्हटले जाते. अनेकदा यामध्ये हृदयाच्या मांसपेशी कमकुवत होऊ शकतात. त्याशिवाय फुप्फुसांचे काम योग्य पद्धतीने न झाल्याने आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने हार्ट डॅमेज होऊ शकते. 6 / 11कार्डियोवक्युलर डिसीजचा सामना करत असलेल्या लोकांमध्येही हार्ट डॅमेज होण्याची शक्यता असते. जुलै २०२० मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार हार्ट इंजरी असलेल्या सुमारे ३० ते ६० टक्के लोकांमध्ये कोरोनरी हार्ट डिसीज किंवा हाय ब्लड प्रेशरसंबंधीच्यी अडचणी दिसून येतात. 7 / 11फुप्फुसांमध्ये एअर बॅगच्या आवराणांदरम्यान एक फ्लुरल स्पेस असते. ती आपल्या फुप्फुसांच्या कड्यामध्ये असते. फ्युरल स्पेसमधून सोडले गेलेले इन्फ्लेमेटरी अणू वेदना देणाऱ्या रिसेप्टर्सला ट्रिगर करू शकतात आणि संभावित रूपामध्ये छातीमध्ये वेदना किंवा जळजळ निर्माण करू शकतात. 8 / 11कोविड-१९मुळे रुग्णांना निमोनियाची समस्याही जाणवू शकते. त्यामुळे अनेकदा छातीमध्ये वेदना वाढू शकतात. निमोनिया फुप्फुसांच्या एल्वियोलीचा संसर्ग असतो. एल्वियोली हवेच्या छोट्या पिशवीसारखी असते. तिथे ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साईड एक्स्चेंज होत राहतो. 9 / 11अनेकदा गळा आणि छातीमध्ये एकाच वेळी वेदना आणि अॅसिड रिफ्लक्स होते. यालाही कोरोनाच्या लक्षणांशी जोडून पाहिजे जात आहे. ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या एका अध्ययनानुसार कोरोनाच्या अनेक केसमध्ये रुग्णाला पचनाशी संबंधीत समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामध्ये भूक न लागणे, जुलाब, मळमळणे, उलटी होणे, पोटात दुखणे, अॅसिड रिफ्लक्स, गळ्यामध्ये वेदना किंवा कफ यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 10 / 11कोविड-१९ शिवाय अन्य काही कारणांमुळेही गळ्यात आणि छातीमध्ये जळजळ आणि वेदना निर्माण होऊ शकतात. पोटात जळजळणे, पोटातील अल्सर, बॅक्टेरियल निमोनिय. हार्ट अॅटॅक, रेस्पिरेटरी इंफेक्शन आणि पॅनिक अॅटॅक यामुळेही असे होऊ शकते. 11 / 11कोविड-१९ झाल्यामुळे काही लोकांना छाती आणि पोटामध्ये जळजळीची समस्या जाणवते. उलटी होणे, अॅसिड रिफ्लक्स आणि डायरियामुळेसुद्धा पोटात या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. मात्र याचीही अनेक कारणे असू शकतात. ज्यामध्ये अन्नविषबाधा, अॅपेंडिक्सचे खडे, हार्टबर्न, स्ट्रेस, एन्जाइटी, हार्ट अॅटॅक आणि पोटामधील अल्सर यासारख्या समस्या होऊ शकतात.