CoronaVirus News : "कोरोनाची लस फक्त लक्षणांपासून संरक्षण करेल, संसर्ग रोखणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 17:26 IST
1 / 10जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरात लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत जगभरातील देशांमध्ये कोरोनावरील लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहे.2 / 10दरम्यान, ब्रिटन आणि अमेरिकेत पुढील एक ते दोन महिन्यांत कोरोना व्हायरसवरील लस तयार होण्याची शक्यता आहे. अशातच कोरोनावरील लस सुरूवातीला फक्त लक्षणे थांबविण्यास सक्षम असू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. 3 / 10अमेरिकेचे प्रसिद्ध संसर्गजन्य रोग तज्ज्ञ अँथनी फाउची यांनी म्हटले आहे की, सुरुवातीला लस तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांचे लक्ष हे संसर्ग पूर्णपणे रोखण्याऐवजी लोकांना लक्षणापासून वाचविण्यावर आहे. अमेरिकेत चार कोरोना व्हायरसच्या लसी क्लिनिकल चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात आहेत, असे डॉ. अँथनी फाउची यांनी सांगितले. 4 / 10तसेच, या लसीचे अंतिम लक्ष्य व्हायरस दूर करणे आहे, परंतु सुरुवातीला शास्त्रज्ञांना प्राथमिक उद्दिष्ट साध्य करायचे आहे, जे लोक कोरोनाची लक्षणे टाळू शकतात, असे डॉ. अँथनी फाउची म्हणाले. 5 / 10डॉ. अँथनी फाउची म्हणाले की, प्राथमिक लक्ष हे आहे की एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर अशा लसीमुळे एखाद्या व्यक्तीला अशा परिस्थितीत आजारी पडण्यापासून वाचवता येते. जर ही लस लोकांना आजारी पडण्यापासून वाचविण्यात सक्षम झाली तर मृत्यूची संख्याही कमी होईल.6 / 10लसीबाबत डॉ. अँथनी फाउची यांच्या इशाऱ्यानंतर, ज्या लोकांना लस आल्यानंतर कोरोना संपेल, असे वाटत आहे, त्यांना धक्का बसेल. लस आल्यानंतरही सोशल डिस्टंसिंग आणि मास्क यासारखे उपाय महत्त्वाचे राहतील, असेही डॉ. अँथनी फाउची यांनी सांगितले.7 / 10यापूर्वी कोरोनावरील लसीबाबत डॉ. अँथनी फाउची यांनी सांगितले होते की, वर्षाच्या अखेरीस कोरोना लस केवळ ५० ते ६० टक्केच प्रभावी असल्याचे सिद्ध होऊ शकते. 8 / 10मात्र, भविष्यात त्याला किमान ७५ टक्के प्रभावी लसची अपेक्षा आहे. सध्या अमेरिकेत अॅस्ट्रॅजेनेका, फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे.9 / 10कोरोनावरील या लसीची अनेक देशांतील लोक आतुरतेने वाट पाहात आहे. तर काही तज्ज्ञांनी या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस लस तयार होण्याचा दावा केला आहे.10 / 10WHO च्या अहवालानुसार, सध्या जगभरात १५४ लसींवर क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. यामध्ये ४४ लस या मानवी चाचणीच्या टप्प्यात आहे. मानवी चाचण्यांमध्येच लसीची प्रभावशीलता आणि सुरक्षितता तपासली जाते. मात्र, ही लस अधिकृतपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याची अजून दोन टप्पे आहेत.