शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus New Symptoms: "केवळ तापच नाही तर..."; कोरोनाची नवीन लक्षणं समोर, AIIMS च्या डॉक्टरांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 15:48 IST

1 / 11
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम देशात पाहायला मिळत आहेत. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतेय. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अनेक वेगळी लक्षणं समोर येत आहेत. त्यामुळेच अनेकांना हे कळत नसल्याने रुग्णांची अवस्था गंभीर होत आहे. AIMMS चे मेडिसिन विभागाचे प्रोफेसर डॉक्टर विजय हुड्डा यांनी ट्विटरवर कोरोनाच्या नव्या लक्षणाबद्दल माहिती दिली ज्याने वेळीच उपचार घेता येऊ शकतात.
2 / 11
कोरोनाची नवी लक्षणं – ताप, घसा खवखवणे, सर्दी, शरीर दुखणे, थकवा ही सर्वसामान्य लक्षण असून आता यात नवीन लक्षणांचा समावेश झाला आहे. काही रुग्णांना अतिसार, पोटात दुखणे, शरीरात बिघाड, उलट्या होणे, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका सारखे नवीन लक्षणे दिसत आहे.
3 / 11
डॉक्टर हुड्डा यांनी सांगितले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत ताप, श्वास घेण्यास त्रास आणि अन्य लक्षणांचा समावेश असलेले रुग्ण ५-७ दिवसांत बरे होत होते. परंतु या लाटेतील रुग्णांमध्ये १० दिवसांपर्यंत ताप कायम राहतो.
4 / 11
त्याचसोबत मागील १ वर्षापासून आम्ही पाहतोय की कोरोना कोणत्याही रुपात समोर यऊ शकतो. रुग्णांना काही अन्य लक्षणं दिसली तरी तात्काळ त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा. काहीही नवीन आणि वेगळं जाणवत असेल तर तेदेखील कोरोनाची लक्षण असू शकतात असं हुड्डा म्हणाले.
5 / 11
इतकचं नाही तर तुम्हाला ऐकून धक्का बसेल डोळे लाल होणे हेदेखील कोरोनाचं लक्षण आहे. सर्वसामान्य लोक याकडे इंफेक्शन अथवा कंजक्टिवाइटिस मानून दुर्लक्ष करतात. परंतु कंजक्टिवाइटिस कोरोनामुळे कमीही होऊ शकतो.
6 / 11
सध्या डॉक्टर सर्व प्रकारच्या लक्षणांना कोरोना मानून चालले आहेत. त्यामुळे रुग्णांनी वेळीच कोरोना चाचणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रोटोकॉलनुसार या रुग्णांवर उपचार सुरू होऊ शकतात.
7 / 11
निती आयोगाचे सदस्य डॉ. वी के पॉल यांनीही सांगितले होते की, फक्त डोकेदुखी आणि अंगदुखी असेल तर कोविड लक्षणं होऊ शकतात मात्र कोरोनाची अन्य काही लक्षणं आहेत ज्याची माहिती नसल्याने रुग्ण गंभीर होऊ शकतो. त्यासाठी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
8 / 11
कोरोनाच्या लक्षणात गंध न येणे, चव न कळणे ही लक्षणंही आहेत. काही लोकांना ताप येण्यापूर्वी ही लक्षणं दिसतात तर काहींना केवळ चव न कळणे, गंध न येणे हेच जाणवतं. ज्या लोकांना गंध आणि चव येत नाही अशांना ठीक होण्यासाठी ६-७ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.
9 / 11
घसा खवखवणे, घशात सूज येणे हे लक्षण असू शकते. तथापि, कोरोना रूग्णांमध्ये हे सर्वात सामान्य लक्षण आहे. जगातील ५२ टक्के लोकांना कोरोनाची ही लक्षणं जाणवतात. काही लोकांच्या घशात जळजळतं. जे आहार करताना त्रासदायक ठरतं.
10 / 11
नव्या कोरोना लाटेत रुग्णांना कमकुवतपणा आणि थकवा लवकर जाणवतो. ही कोरोनाची सुरुवातीची लक्षणं आहेत. या लक्षणांना सर्वसामान्य समजण्याची चूक करू नका
11 / 11
जास्त थंडी वाजत असेल तर तेदेखील ताप येण्याचे संकेत असतात. त्याचा अर्थ तुम्ही व्हायरसच्या संक्रमणात आले आहात. कोरोनाची ही लक्षणे पहिल्या लाटेतही दिसत होती आणि आताही दिसतात. त्याशिवाय स्नायू आणि सांधेदुखीशिवाय एक सामान्य लक्षण देखील आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या